छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. देशात वाढत्या साधनसामुग्रीच्या मागणीमुळं कोळशाची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे. त्यामुळे डोंगरभागातील खाणींमधून कोळसा काढण्याचं काम वेगात सुरु आहे. अशातच कोरबा जिल्ह्याच्या कुसमुंडाच्या खाणीत कोळसा काढण्याआधीच मोठा स्फोट झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा स्फोटाचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा स्फोट इतका भीषण आहे की, खाणीतील धुळीचे लोळ आकाशात जमा झाले आहेत. कुसमुंडाच्या कोळसा खाणीत झालेल्या स्फोटाचा व्हिडीओ पाहून नागरिकांमध्ये भातीचं वातावरण पसरलं आहे. खाणीजवळ असलेल्या गावांमध्ये राहणारे लोक सतर्क झाले आहेत. दरम्यान, या स्फोटात खूप मोठ्या प्रमाणावर दारुगोळ्याचा वापर करण्यात आला आहे.

आणखी वाचा – “सागर किनारे दिल ये पुकारे” पठ्ठ्याचा नादच खुळा, चक्क मगरीची केली मसाज, ”पुढे जे घडलं…”, थरारक Viral Video पाहाच

स्फोट झाल्यानंतर काय झालं?

कोळसा खाणीत झालेला हा स्फोट सोशल मीडियावर अनेक प्लॅटफॉर्म्सवर शेअर करण्यात आला आहे. कोळशाच्या खाणीत स्फोट झाल्यानंतर ४० फूट उंचावर धूळीचे लोट पसरत असल्याचं या व्हिडीओत पाहू शकता. एकापाठोपाठ एक अनेक स्फोट होताना या व्हिडीओत दिसत आहेत. खाणीतील ही थरारक दृष्य पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. मोठ्या आवाजात खाणीत स्फोट होत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

इथे पाहा व्हिडीओ

स्फोटामुळं स्थानिकांच झालं नुकसान

मिळालेल्या माहितीनुसार, कोळसा खाणीत स्फोट झाल्यानंतर परिसरातील गावांमध्ये जमिनीला मोठे हादरे बसले आहेत. या स्फोटांमुळं अनेकांच्या घराचे नुकसान झाले आहे. खाणीत झालेल्या स्फोटामुळं घरातील भींतींना तडे गेले आहेत. गावातील ग्रामस्थांना नुकसान भरपाई दिली जाईल, अंस आश्वासन शासकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं आहे. परंतु, सतत होणाऱ्या या स्फोटामुळं लोकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blast in kusmunda coal mines of chhattisgarh people afraid of incident viral video on social media nss
First published on: 19-11-2022 at 16:43 IST