अन् त्याने मुलाचे नाव ठेवलं ‘मतदान

मतदानाच्या दिवशी बाळाचा जन्म झाला

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

मध्य प्रदेशात काल (बुधवारी) विधानसभा निवडणूक पार पाडली. निवडणुकीच्या दिवशी मध्य प्रदेशमधील एका घरामध्ये गोंडस बाळाने जन्म घेतला. मतदानाच्या दिवशी बाळाचा जन्म झाला म्हणून आई-वडिलांनी त्याचे नाव चक्क मतदान ठेवलं आहे. २६ वर्षीय संतोष पत्नी रूग्णलयात असतानाही आपला हक्क बजावण्यासाठी आला होता. संतोष हा मध्य प्रदेशमधील खातेगांव येथील रहिवाशी आहे. त्याच्या पत्नीचे नाव विशाखा असे आहे.

मतदान केंद्रापासून रूग्णालय १२० किमी अंतरावर होते. पत्नी कोणत्याही क्षणी बाळाला जन्म देऊ शकते. अशावेळी संतोषने एखाद्या कर्तव्यदक्ष नागरिकाप्रमाणे मतदानाचा हक्क बजावाला. मतदानाच्या रांगेत काही तास गेल्यानंतर तात्काळ संतोषने रूग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. रूग्णालयात पोहचण्यासाठी त्याला पुन्हा दोन-तीन तासांचा कालावधी लागला. संतोष ज्यावेळी रूग्णालयात पोहचला त्यावेळी त्याच्या पत्नीनं एका गोंडस मुलाला जन्म दिल्याची बातमी त्याला समजली. आपण बाप झाल्याचे समजताच संतोषचा आनंद द्विगुणीत झाला. आणि आनंदाच्या भरात त्यानं त्याच्या मुलाचं नाव ‘मतदान’ असं ठेवलं.

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत बुधवारी एकूण ६५.५ टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. यापूर्वीच्या निवडणुकीतील मतदानापेक्षा हे प्रमाण ७ टक्क्य़ांनी कमी आहे. २०१३ सालच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात ७२.६९ टक्के मतदान झाले होते

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Born on polling day named matdaan