Shocking video: वेगवेगळ्या मॉल्समध्ये अनेकजण एस्केलेटर म्हणजेच स्वयंचलित पायऱ्यांचा वापर करतात. अनेकजण जर उत्साहाच्या भरात त्यावर स्टंटही करतात. इतकेच नाही तर अनेकजण सोबत आणलेल्या लहान मुलांकडेही यावरून जाताना फार लक्ष देत नाहीत. लहान मुलं नेहमीच मस्तीच्या मूडमध्ये असतात. मौजमजा करताना अनेक वेळा त्यांना अशा धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागते, त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. अशा अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील ज्यात खेळताना मुलाचे काही वाईट झाले असेल. आता अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू येईल. प्रत्यक्षात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका मुलाने खेळताना जीव धोक्यात घातल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहातानाही अंगावर काटा येतो.
१६ जुलै रोजी चीनमधील चोंगकिंग येथे एका चिनी मुलाचे डोके एस्केलेटर आणि लगतच्या भिंतीमध्ये अडकले होते. व्हिडिओमध्ये एक लहान मूल एस्केलेटरवर चढताना दिसत आहे. या दरम्यान तो एस्केलेटर आणि भिंत यांच्यातील गॅपमध्ये डोके ठेवतो आणि एस्केलेटर पुढे सरकते तसं तो मुलगाही त्यात अडकतो. सुरुवातीला काय घडत आहे हे कोणाच्याही लक्षात येत नाही. मात्र, मुलाजवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्याला त्रास होत असल्याचे पाहून त्याचे डोके बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला.
यावेळी दीर्घ प्रयत्नांनंतर या मुलाला प्राणघातक सापळ्यातून बाहेर काढण्यात आले. सुदैवाने, त्याला दुखापत झाली नाही आणि त्याला तपासणीसाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले, असे वृत्त आहे. ही प्राणघातक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्सुकतेपोटी मुलाने त्याचे डोके एस्केलेटर आणि भिंतीच्या मध्ये अडकवले. सुदैवाने स्थानिकांपैकी कोणीतरी जाणीवपूर्वक एक्सेलेटर हलवण्यापासून रोखले आणि एक मोठी दुखापत झाली. एस्केलेटर हलणे थांबवले असले तरी, मुलगा त्याचे डोके बाहेर काढण्यासाठी धडपडताना दिसत आहे. काही स्थानिक लोक अडकलेल्या मुलाला वाचवण्यासाठी आले आणि त्याला कोणतीही दुखापत न होता सापळ्यातून बाहेर काढण्यास मदत केली.
पाहा व्हिडीओ
संपूर्ण घटना पाहणाऱ्यांनी कैद केली आणि @livingchina ने इंस्टाग्रामवर पोस्ट केली. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “संशोधकाचे बालपण. आशा आहे की तो भविष्यात अधिक हुशार होईल.” असं लिहलं आहे.
काही दिवसांपूर्वी, सोशल मीडियावर आणखी एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक मद्यधुंद माणूस, ज्याचे नाव अज्ञात आहे, दारूच्या दुकानाच्या लोखंडी ग्रिलमध्ये दारूची बाटली घेण्याच्या प्रयत्नात अडकला होता. दुकानातील इतर ग्राहकांच्या दीर्घ प्रयत्नांनंतर त्याला वाचवण्यात आले. अहवालात असेही म्हटले आहे की दारूचे दुकान बंद होते आणि बाटली हिसकावण्याचा प्रयत्न करताना तो माणूस अडकला होता.