देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तो पूर्णपणे नष्ट झालेला नाही. लोकांना शक्य तितकं स्वच्छ आणि काळजी घेण्याचं आवाहन सरकारकडून वारंवार केलं जातं. चांगला आणि संतुलित आहार करण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरुन आपलं शरीर निरोगी आणि तंदुरुस्त रहाण्यास मदत होईल.अशातच लहान मुलांना कुठे बाहेर नेल की त्यांच्या उचापत्या काही कमी नसतात, त्यांच्या मस्तीची शिक्षा कधी कधी आई वडिलांना भोगावी लागते असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा किळसवाणा प्रकार एका हॉटेलमध्ये करण्यात आलाय, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही राग अनावर होईल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुलाच्या मजा मस्तीमुळे आईला खूप मोठा भुरदंड भरावा लागला. सोशल मीडियावर चर्चेत आलेलं हे प्रकरण नेमकं नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया. एका मुलाने रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर सॉसची बाटली चाटली. यासाठी त्याच्या आईला 4 कोटींचा दंड भरावा लागला. मुलाची मजा एवढी महागात पडेल असा विचारही महिलेनं केला नसेल. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – Video: तहानलेला उंट उष्णतेमुळे अर्धमेला; ट्रकचालक देवासारखा धावून आला! शेवट पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ पाहून लोकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. @ju__pippippi नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर अशा विचित्र घटना कायमच समोर येताना दिसतात.