Shocking video: रील बनवण्यासाठी हल्ली लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. या रील्सच्या नादात आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. पण, त्यातूनही लोक धडा घेताना दिसत नाही. लोक रीलसाठी कधी स्वत:चा तर कधी इतरांचा जीवदेखील धोक्यात टाकायला अजिबात घाबरत नाहीत. यात हल्ली रेल्वेस्थानक, ट्रेनच्या पटरीवरही अगदी बिधास्तपणे रील व्हिडीओ शूट करत असतात. असाच प्रकार समोर आला आहे, जिथे एक तरण रील शूट करण्यासाठी थेट रेल्वे रुळावर झोपला आहे. बरं समोरुन भरधाव वेगात एक्सप्रेस येत आहे तरी ती रुळावरुन बाजूला झाला नाही मग शेवटी काय झालं तुम्हीच पाहा..

सोशल मीडियावर व्हायरल झालेला तरुणाचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कपाळावर हात माराल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक तरुण अक्षरश: रेल्वे रुळावर झोपला आहे. हातात फोन घेऊन तो रेल्वे रुळामध्ये व्हिडीओ काढण्यासाठी हा स्टंट करताना दिसतोय. पटरीच्या मधोमध झोपून तो हा व्हिडीओ काढताना दिसतेय. तेवढ्यात एक भरधाव वेगात एक ट्रेन येते आणि या ट्रेनचा संपूर्ण व्हिडीओ तो मोबाईलमध्ये रेकॉर्ड करतो. दरम्यान, यावेळी त्याची थोडीशी हालचाल जीवघेणी ठरु शकते. व्हिडीओ पाहताना तु्म्हीही श्वास रोखून धराल एवढं नक्की.

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता. रेल्वे रुळावर एक तरुण येतो आणि रेल्वे रुळावर बसतो. त्यानंतर थेट तो रेल्वे येण्याच्या काही वेळाआधी त्या रेल्वे ट्रॅकवर झोपतो. सुरुवातील काही समजत नाही. मात्र, तरुण रेल्वे ट्रॅकवर झोपताच त्याच्यावरुन एक भरधाव वेगान ट्रेन जाते. फक्त सोशल मीडियाच्या रिल्ससाठी तरुणाने हा भयंकर प्रकार केलेला असतो.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ mdboni.amin.587 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून नेटकरी मात्र व्हिडीओवर टीका करत आहेत. काही लोक लाइक्स आणि व्ह्यूजच्या शर्यतीत आपला जीव धोक्यात घालण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरीही संताप व्यक्त करत आहेत.