Viral video: सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर काही व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात. जगात माणुसकी शिल्लक राहिली नाही असं अनेकदा आपण म्हणत असतो. पण काही व्हिडीओ असे असतात ते पाहून कुठेतरी खरंच माणुसकी अजूनही आहे हे सिद्ध होतं. असाच माणुसकीचं दर्शन घडवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मात्र या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक आज्जी रस्त्यावर खाण्याचं साहित्य घेऊन विकण्यासाठी बसली आहे. यावेळी एक तरुण आज्जीकडे येतो आणि आज्जीला भूक लागली आहे असं सांगतो. तसेच माझ्याकडे पैसे नाहीत, तुम्ही मला हे फ्रीमध्ये द्याल का अशी विचारणा करतो. यावर आज्जी काहीच न विचारता तरुणाच्या हातावर खायचं पॅकेट ठेवते. यावर तरुण आज्जीला याचे पैसे दोन दिवसांनी देतो असं सांगतो. तरीही आज्जी नको पैसे तू खा असं त्याला सांगते. माणुसकीचं ताजं उदाहरण पाहायला मिळालं असून या तरुणानं या आज्जीसोबत प्रँक केला आहे.

थोड्यावेळानं हा तरुण पुन्हा या आज्जीकडे येतो आणि आज्जीला खरं काय ते सांगून टाकतो. यावर आज्जी शॉक होऊन हसू लागते. आज्जी पैशानं गरीब असेल पण मनाने किती श्रीमंत आहे. हे या व्हिडीओमधून समोर आलं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ड्युटी सांभाळताना पोलिसांनी धरला ठेका; मुंबई लोकलमधला ‘हा’ VIDEO एकदा पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीमंती फक्त पैशाशीच नसते तर मनाचीही असते हे दाखवणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सध्या जगातील माणुसकी हरवली आहे असं सर्रास बोललं जातं. संकटकाळात एखाद्याला मदत करावी किंवा एखाद्याला आपल्या ताटातले अन्न खायला दिले पाहिजे असं आपल्याला लहानपणापासून शिकवण्यात आलं आहे.पण आपण कितीवेळा अशी मदत करतो? मात्र हा व्हिडीओ पाहून माणुसकी अजून जिवंत आहे, असं म्हणायला हरकत नाही,.