scorecardresearch

Premium

ड्युटी सांभाळताना पोलिसांनी धरला ठेका; मुंबई लोकलमधला ‘हा’ VIDEO एकदा पाहाच

Viral video: मुंबई लोकलमधला ‘हा’ VIDEO एकदा पाहाच

girl dance in local train front of policeman video goes viral
तरुणीनं लोकलमध्ये पोलिसांसमोर धरला ठेका

Viral video: सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे, जेथे आपल्या नवनवीन व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपलं मनोरंजन करतात. येथे आपल्याला कॉमेडी, इंफोर्मेटीव्ह आणि बरेच क्राफ्ट व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. सोशल मीडियाच्या जगात तरुणाई लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्ग शोधत असतात. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी तरुणाई कोणत्याही थराला जायला मागे पुढे बघत नाही. अशाच एका तरुणीचा लोकल ट्रेनमधला व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. या तरुणीनं पोलिसांसमोर असं डेरींग केलं आहे जे पाहून तु्म्हीही अवाक् व्हाल…

आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महिलांच्या लोकल डब्यात रात्रीचे पोलीस तैनात असतात. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस नेहमी पाहायला मिळतात. हे पोलीस आपलं कर्तव्य चोख पार पडत असले तरी त्यांच्या वर्दीमागे एक सामान्य माणूस असतो. त्यालाही कधीतरी कंटाळा येतो, किंवा त्याच्याही काही आवडी निवडी असतात. अशाच एका पोलिसांचं छुपं टॅलेंट या तरुणीनं बाहेर काढलं.

traffic cop beaten up in versova
मुंबई : वर्सोवा येथे वाहतुक पोलिसाला मारहाण
मुंबईतील प्रमुख उड्डाणपुलांना बोगनवेलचा साज
Pimpri Chinchwad, police, mephedrone drug
पिंपरी- चिंचवड पोलिसांनी पकडलं लाखोंचं मेफेड्रोन ड्रग्स; एक जण ताब्यात
Delhi Farmer protest Tractors Dangerous Look That Will break Barricades Tear Gas will Fail Due To Technology But Photos Are AI Made
बॅरिकेड्स मोडणार, अश्रुधुरही पडेल फिका, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे ट्रॅक्टर पाहून धक्काच बसेल; पण थांबा, खरं काय बघा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी ट्रेनमध्ये अचानक नाचू लागते, तिला पाहून पोलीस सुरुवातीला गोंधळतात मात्र नंतर ते सुद्धा तिच्या सोबत नाचू लागतात. ड्युटी सांभाळताना पोलिसांनी धरेलला हा ठेका पाहून सर्वच आवाक् झाले. ट्रेनमध्ये असलेले इतर प्रवासीही या पोलिसांकडे पाहत राहिले. पोलिसांनी नाचण्याचा मनसोक्त आनंद घेतल्यानं नेटकरी तरुणीचं कौतुक करत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जेव्हा स्वप्न पूर्ण होते! आई विमानात बसली आणि कळले आपला लेकच पायलट आहे; माय-लेकाचा हृदयस्पर्शी VIDEO

तरुणी खरोखर पोलिसांसोबत नाचत आहे की पोलिसांच्या पोषाखात दिसत असलेली व्यक्ती फेक आहे याबाबत खरी माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय आणि लोकांचं मनोरंजन करत आहे. हा व्हिडीओ एक्सवर @Vivekspeaks_ या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Girl dance in local train front of policeman video goes viral on social media srk

First published on: 11-12-2023 at 18:06 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×