सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील बहुतांश व्हिडिओ हे डान्सशी संबंधित असतात. शिवाय डान्सचे व्हिडिओ खूप मजेशीर असतात. यातील काही व्हिडीओ लग्नाच्या वरातीमधील तर कधी कॉलेजमधील. नुकतेच काही तरुणांनी स्प्लेंडर डान्स केल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. जो पाहून अनेकजण थक्क झाले होते. कारण यामध्ये तरुणांनी चक्क खांद्यावर स्प्लेंडर उचलून घेत डान्स केला होता.

सध्या तीन लहान मुलांचा अप्रतिम असा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. जो पाहून तुम्हीदेखील या मुलांच्या डान्सचे कौतुक कराल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तीन मुलांनी मुलींप्रमाणे वेषभूषा केल्याचं पाहायला मिळत आहे. साडीमध्ये डान्स करणाऱ्या या मुलांना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण ती मुलं आहेत असं डान्स करताना अजिबात जाणवत नाही.

हेही पाहा- Video: नवरीने स्वत:च्या लग्नातच घातला गोंधळ! ड्रेस व्यवस्थित नसल्याचं सांगत हातात माईक घेतला अन्…

व्हिडीओमध्ये काही मुलं शाळेतील कार्यक्रमात पारंपारिक पद्धतीने साडी नेसल्याचे दिसत आहेत. शिवाय ही मुलं मुलींसारखी वेशभूषा करुन डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पहिल्यांदा बघताना व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी प्रत्यक्षात मुलगा आहे हे ओळखणे खूप कठीण जात आहे. हा व्हिडीओ पाहणाऱ्या नेटकऱ्यांना या मुली नसून मुलं आहे हे समजताच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

मुलींच्या वेशात डान्स करतायत मुलं –

हेही पाहा- बार मॅनेजरच्या डेस्क ड्रॉवरमध्ये लपला होता अजगर, सामान बाहेर काढण्यासाठी ड्रॉवर उघडला अन्…, थरारक Video व्हायरल

व्हायरल होत असलेल्या मुलांच्या डान्सचा व्हिडीओ एम.पी धसवंत नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, शाळेच्या एका कार्यक्रमादरम्यान, मुलींच्या वेशभूषेत तीन मुले डान्स कराताना दिसत आहेत. मुलांनी पारंपारिक साड्या नेसल्या असून व्हिडिओमध्ये सर्वजण अवन इवान या चित्रपटातील ‘दिया दिया डोले’ या हिट गाण्यावर डान्स करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ सर्वांनाच आवडला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ १ लाख २७ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर अनेकजण या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले, “मी अजूनही गोंधळलेलो आहे, ही मुलं आहेत की मुली काही समजेना” तर अनेक नेटकऱ्यांनी मुलांच्या डान्सचे तोंडभरुन कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे. काही युजर्सनी हा डान्स खूप मनमोहक असल्याचं म्हटलं आहे.