Bride video viral: लग्न हे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्या लग्नाचे स्वप्न पाहतात. आपला भावी जोडीदार कसा असेल याची कल्पना करतात आणि जेव्हा हे स्वप्न सत्यात उतरते तेव्हा त्यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी कोणतीही असू शकत नाही. अरेंज असो की लव्ह, लग्न करताना प्रत्येक मुलगा किंवा मुलीची एवढीच इच्छा असते की त्यांना मनासारखा जोडीदार मिळाला पाहिजे. जेव्हा मनासारखा जोडीदार मिळतो तेव्हा लग्नातील प्रत्येक क्षण नवरा- नवरी दोघांसाठी आनंदी आणि आणखीच खास होतो. अशाच एका नवरीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे जिला मनासारखा जोडीदार मिळल्याचा आनंद झाला आहे.
पती पत्नीचे नाते हे जगावेगळे असते. लग्नानंतर दोन व्यक्ती एकत्र येऊन नवीन आयुष्याची सुरूवात करतात. एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन देतात. एकमेकांच्या सुख दु:खात कायम बरोबर राहतात. या नात्यात एक वेगळे प्रेम आणि जिव्हाळा पाहायला मिळतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्नाच्या वरातीत नवरीला नवरदेवानं उचलून घेतलं आहे. यावेळी नवरीला झालेला आनंद शब्दात सांगता न येणारा आहे. नवरी फायर गन घेऊन नाचताना याठिकाणी दिसत आहे. तर नवदेवही जोषात नाचत आहे.
पाहा व्हिडीओ
लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. लग्न म्हटल्यावर भरमसाठ नातेवाईक, पंचपक्वान आणि डीजेचा ताल या गोष्टी आल्याच.प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्याला कशी बायको हवी यासाठी काही स्वप्न पाहत असतात. सुशील, सुंदर, चांगलं जेवण बनवणारी अशी मुलगी असावी अशी प्रत्येकच मुलाची अपेक्षा असते. अशात आता सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये असलेली नवरी पाहून तुम्हीही म्हणाल मला सुद्धा अशीच नवरी पाहिजे.