Bride Father Emotional Video: वयात आलेल्या लेकीच्या लग्नासाठी स्वतःच मागे लागलेले आई वडीलही कित्येकदा लेक सासरी जाण्याच्या क्षणासाठी मात्र तयार नसतात. लग्नाची धावपळ, पाहुण्यांचा मान, जेवणाची गडबड, सगळी सोय बघताना अचानक तो क्षण डोळ्यासमोर येतो आणि मग सगळ्या आठवणींसह अश्रूंचा बांधही फुटतो. एकीकडे लेकीच्या सुखाने आनंदी मन तर दुसरीकडे ज्या काळजाच्या तुकड्याला आजवर जपलं तो दुसऱ्याच्या हवाली करण्याचं दुःख. हे सगळं सहन करताना मोठं मन असावं लागतं. अशाच एका मोठ्या मनाच्या वडिलांनी आपल्या जावयाकडे लेकीला सांभाळून घेण्यासाठी केलेली विनंती सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्यावाचून राहणार नाही.

व्हिडिओमध्ये मुलीचे वडील तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडे आपल्या लेकीचा हात देताना त्याला म्हणतात की, “माझा जीव आज मी तुझ्याकडे सोपवत आहे. माझ्या मुलीच्या सुखाला नेहमी प्राधान्य देशील अशी अपेक्षा. तुमचं नातं नेहमी टिकून राहावं अशी माझी देवाकडे प्रार्थना आहे, पण जर कधी भविष्यात तुझं मन बदललं आणि तुझं माझ्या लेकीवरचं प्रेम कमी झालं तर तिला त्रास देऊ नको, दुखावू नकोस, तिला माझ्याकडे परत आणून दे, ती माझी आहे, मी तिला सांभाळेन.”

अवघ्या एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये या वडिलांच्या प्रत्येक शब्दाने मंडपातील प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तुम्हीही हा सखान प्रत्यक्षच पाहा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिस सिंगापूर इंटरनॅशनल टायटल विजेती कॅली Yeo हिच्या लग्नातील हा व्हिडीओ आहे. प्राप्त माहितीनुसार हे लग्न कोविड दरम्यान म्हणजेच २०२१ मध्ये झाले होते पण आता दोन वर्षांनी पुन्हा हा व्हिडीओ इंस्टाग्रामसह सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. मूळ अकाउंट व्यतिरिक्त सुद्धा अन्य ठिकाणी शेअर केलेल्या या क्लिपला कोट्यवधी व्ह्यूज व लाखो लाईक्स आहेत. व्हिडीओ जरी परदेशातील असला तरी प्रत्येक वधुपित्याच्या भावना अशाच असतील असेही अनेकांनी कमेंट मध्ये म्हटले आहे.