Viral video: लग्न समारंभ म्हणजे आता एक मोठा इव्हेंट बनला आहे. लग्नात आता नवरा नवरी प्रचंड वेगवेगळ्या हौशी करतात. त्यात फोटोशूट तर अगदी महत्त्वाचंच. लग्नात बाकी काही नसेल तरी चालेल मात्र फोटोग्राफर हवाच. आतापर्यंत तुम्ही अनेक हौशी नवऱ्या पाहिल्या असतील. अशाच एका हौशी आणि अतिउत्साही नवरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोशूट करताना नवरीबाई लेहंग्यामध्ये अडकते आणि अशी फजिती होते की तुम्ही व्हिडीओमध्येच पाहा.

लग्न सराईचा सीजन सुरु झाला असून सोशल मीडियावर एकाहून एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. नवरा-नवरी भर लग्नमंडपात थिरकतानाचे व्हिडीओही इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले आहेत. तसंच नव वधू-वरांच्या लग्नातील पोट धरून हसण्यासारखे धमाल किस्सेही समोर येत आहेत. असाच काहीसा प्रकार एका लग्न सोहळ्यात झाल्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. प्री वेडिंग शूटसाठी आणि लग्न सोहळ्यात फोटोग्राफ्री करताना केलेली घाई कशी हास्यास्पद ठरते, हे एका व्हायरल झालेल्या एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ लग्न सोहळ्यातील एका फोटो शूटचा आहे. सोशल मीडियावर प्रकाशझोतात येण्यासाठी जबरदस्त फोटो काढण्याचं वेडं हल्लीच्या तरुणांना लागलं आहे. लग्नातही नवरा-नवरी भन्नाट डान्स करून थिरकतानाचे फोटो व्हायरल झालेले आहेत

अनेकदा लेहंग्याच्या वजनामुळं अशी फजीती होत असते, असंच या तरुणीसोबत घडलं. नंतर फोटोग्राफरनंच तिला मदतीसाठी हात दिला. पडूनही नवरी हसतच असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! सापापासून बघा कशी बनवली जाते दारू; हा VIDEO पाहून सांगा ही दारू पिण्याची हिंमत करणार का तुम्ही?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओला लाईक केलं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरलं नाहीय. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.