Bride Viral Video : गेल्या काही दिवसांपासून लग्न सराईचा सीजन सुरु झाला असून नवरा-नवरीचे जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नमंडपात वधू-वराला शुभाशिर्वादात देण्यासाठी वऱ्हाडी मंडळी बॅंड बाजाच्या तालावर थिरकतानाही दिसतात. आपल्या लग्नसोहळ्यात आलेल्या पाहुण्यांचं मनोरंजन करण्यासाठी काही जोडपे डीजेवर भन्नाट डान्स करतानाही दिसतात. नवरा-नवरीचे असे एकाहून एक जबरदस्त व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात. पण बंगळुरुच्या एका नवरीनं कमालच केलीय. लग्नमंडपात वेळेवर पोहोचण्यासाठी निघालेली नवरी वाहतूक कोंडी झाल्यावर भन्नाट शक्कल लढवते. वाहतूक कोंडीत अडकलेली कार रस्त्यावरच सोडली अन् मेट्रो स्टेशनच्या दिशेनं निघाली. लग्नमंडपात वेळेवर पोहोचण्यासाठी कार रस्त्यावर सोडून नवरीने चक्क मेट्रो ट्रेनने प्रवास केला. नवरीचा हा जबरदस्त व्हिडीओ इंटरनेटवर लाखो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

नवरीचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला, पाहा व्हिडीओ

फॉरेव्हर बंगळुरु नावाच्या ट्विटर हॅंडलवर नवरीचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. नवरीने सुंदर साडी नेसून चमकदार दागदागिने घातले असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. बंगळुरुच्या मेट्रोत नवरीने लग्नमंडपात पोहोचण्यासाठी केलेला प्रवास तिच्या आयुष्यातील एक अविस्मणीय क्षण नक्कीच होईल. वाहतूक कोंडीत कार अडकल्यानंतर नवरीने नवऱ्याला भेटण्यासाठी मेट्रो स्टेशनकडे धाव घेतली. नवऱ्यासाठी कायपण, अशा भावनेनं नवरीने ट्रेनने केलेला प्रवास अनेकांच्या भुवया उंचावून गेला आहे. लग्नाचा मुहूर्त चुकू नये, यासाठी नवरीने कर्तव्यदक्ष होऊन वाहतूक कोंडीत अडकलेल्या कारला रस्त्यावरच सोडलं अन् मेट्रो ट्रेनने प्रवास केला. या नवरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव करताना दिसत आहेत.

नक्की वाचा – त्या तरुणीनं २९ सेकंदातच विश्वविक्रमाला घातली गवसणी, बुद्धीच्या खेळात रचला मोठा डाव, पाहा Video

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “ती एक सुंदर आयुष्य जगेल, अशा प्रकारची विचारसरणी तिचं जीवन सुखी करेल.” तसंच दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं, “नशिबवान नवरी.” तर अन्य एका नेटकऱ्यानं मिश्किल टीपण्णी करत म्हटलं, “मेट्रोचे आभार, लग्नसोहळा रद्द झाला नाही.” नवरीचा हा व्हिडीओ इंटरनेटवर लाखो नेटकऱ्यांनी मनं जिंकत आहे. नवरीनं वेळेत लग्न लागण्यासाठी मेट्रोचा प्रवास केला, हे पाहून वऱ्हाड्यांनी तसेच नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. हा सुंदर व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना असंही म्हटलंय, “खरंच नवरी असावी तर अशी.”