नवरदेवाला चिडवण्यासाठी वधू चक्क स्टेजभर धावली! नेटिझन्स गंमतीने म्हणाले, “अरे, ही तर कबड्डी”

तुम्ही कधी भर लग्नात कोणत्या वधूला ‘कबड्डी’ खेळताना पाहिलंय का? नाही ना. पण आता असाच एक गंमतीदार व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलीच मजा आणतो आहे.

bride ran around stage to tease groom Netizens jokingly said Hey this is kabaddi gst 97
नवरदेव वरमाला घालण्यासाठी गेला तेव्हा ती वधू त्याला चिडवण्यासाठी अक्षरशः स्टेजभर धावली. सोशल मीडियावर गंमतीदार हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. (Photo : Manish Mishra/Twitter)

जगभरात अशी अनेक जोडपी आहेत ज्यांनी आपल्या स्वतःच्याच लग्न समारंभात एकापेक्षा एक मजेदार ट्विस्ट आणले आहेत. तर काहींच्या लग्नात अनपेक्षितपणे काही मजेदार गोष्टी घडल्या जे कॅमेरात कैद झाल्या आणि तुफान व्हायरल झाल्या. कधी वधू स्वतःच्याच लग्नात नाचत येऊन दमदार एंट्री करते तर कधी नवरदेव भर लग्नमंडपात वर्क फ्रॉम होममध्ये गुंग झालेला दिसतो, कधी वधू भेटवस्तू आवडली नाही म्हणून थेट भिरकावून देते तर कधी नवरदेव वधूच्या शेजारी भर स्टेजवर थेट झोपून जातो. सोशल मीडियावर हे असे कित्येक व्हिडीओज जबरदस्त व्हायरल झाल्याचं आपण पाहिलं आहे. दरम्यान, आताही अशाच एका लग्नातील व्हिडीओ चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. तुम्ही कधी भर लग्नात कोणत्या वधूला ‘कबड्डी’ खेळताना पाहिलंय का? नाही ना. पण मध्येच हा प्रश्न का? तर आता असाच एक गंमतीदार व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलीच मजा आणतो आहे ज्यात वधू थेट ‘कबड्डी’ घेण्याच्या मूडमध्ये दिसत आहे.

मनीष मिश्रा यांनी ट्विटरवर अलीकडेच एका लग्न समारंभातील व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. ज्यात वधूवरांचा जयमाला घालण्याचा सोहळा सुरु आहे. मात्र, यावेळी वधू काही नवरदेवाला सहजासहजी वरमाला घालू देत नाही असंच दिसत आहे. इतकंच नव्हे तर जेव्हा तो नवरदेव वधूला वरमाला घालण्यासाठी गेला तेव्हा त्याला चिडवण्यासाठी ती वधू अक्षरशः स्टेजभर धावताना दिसली आहे. म्हणूनच हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ती वधू कबड्डी खेळण्याच्या मूडमध्ये असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान, काही नेटिझन्सनी मात्र याव्हिडीओबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

‘हा’ व्हायरल व्हिडीओ नेमका आहे तरी काय? पाहुयात :

ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करताना मनीष मिश्रा आपल्या कॅप्शनमध्ये गंमतीने लिहितात कि, “जरी दिसताना हा जयमाला घालण्याचा सोहळा दिसत असला तरीही ही वधू मात्र कबड्डी खेळण्याच्या मूडमध्ये आहे असं वाटतंय. पण नवरदेवाच्या मित्रांचे खरंच आभार कारण अखेर त्यांच्यामुळेच हा सोहळा पूर्ण होऊ शकला आहे.” या पोस्टनंतर काहीच वेळात या व्हिडीओला लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. दरम्यान, या व्हिडिओवर नेटिझन्सकडून चांगल्या-वाईट अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया आल्याचं दिसून आलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bride ran around stage to tease groom netizens jokingly said hey this is kabaddi gst

ताज्या बातम्या