भारतीय लग्न म्हटलं की, एखाद्या सण उत्सवाप्रमाणेच खाण्यापिणं, महागडे कपडे-दागिने, डान्स, गायन-वादन, रडणे-साजणं अशा अनेक गोष्टी आल्याच. सध्या सोशल मीडियावर भारतीय लग्नामधील वेगवेगळे व्हायरल व्हिडीओ पहायला मिळतात. यात काही व्हिडीओ नवरा-नवरीचे विनोदी प्रसंगाचे असतात, तर काही व्हिडीओमध्ये भावूक झालेले नवरा-नवरी दिसत असतात. पण सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा कोणत्या नवरा-नवरीचा नव्हे, तर नवरीच्या आजीबाईने नातीच्या लग्नात केलेल्या तुफान डान्सचा आहे. या आजीबाईंचा जबरदस्त डान्स परफॉर्मन्स पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हास्य आल्याशिवाय राहणार नाही.

नातीचं लग्न होत असल्याच्या आनंदात डान्स करणाऱ्या या आजीबाईंच्या चेहऱ्यावरचे अप्रतिम एक्सप्रेशन्स पाहून तुम्ही सुद्धा कौतुक कराल. या आजीनं वरातींच्या इतक्या गर्दीत स्वतःला एका बॉसप्रमाणे ट्रीट केलंय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरीची आजी सुप्रसिद्ध बॉलिवूड गायक उदित नारायण यांचं सुपरहिट गाणं ‘खंभे जैसी खडी है, लडकी है या छडी है’ या गाण्यावर थिरकताना दिसून येत आहे. डान्स फ्लोअरवर वरातीतले आणखी बरेच जण या व्हिडीओमध्ये आजुबाजुला दिसून येत आहेत. पण आजींच्या या धमाकेदार परफॉर्मन्सला बरोबरीची टक्कर देणारं कुणीच दिसत नाही.

हा व्हिडीओ २०१९ मध्ये इव्हेंट फोटोग्राफर टीम फिल्म स्क्रीनने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यानंतर ब्राइड्स स्पेशल नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ पुन्हा शेअर करण्यात आलाय. नातीच्या लग्नातला आजीचा हा स्वॅग पाहून प्रत्येक जण तिचे फॅन बनले आहेत. आजीबाईंचा हा डान्स पाहताना त्यांच्या वयाचा विसर पाहणाऱ्यांनाही पडत आहे. आणखी एक बाब म्हणजे आजीबाईंचा फिटनेस. सहसा वय वाढत गेलं की आजारपण आणि दुखणीही वाढतात. पण, या आजी मात्र त्याला अपवाद ठरत आहेत असं म्हणायला हरकत नाही. या आजीला त्यांच्या वयामुळे हवे तसे ठुमके लावता येत नसले तरी त्यांनी त्यांच्या एक्सप्रेशन्सनी सर्वांची मन जिंकली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नातीच्या लग्नात आजीने केलेल्या या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओला आतापर्यंत १ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ४,८५९ लोकांनी लाईक्स दिले आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी आजीचं कौतुक केलंय. कुणी या आजीला ‘बॉस दादी’ म्हणतंय तर कुणी ‘कूल दादी’ म्हणत आहेत.