Viral video: ऐन उन्हाळ्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. यातून नद्या नाल्यांना पाणीच पाणी आले आहे. या मुसळधार पावसामुळे नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे पाणीपातळी पूर्ण संचय पातळीच्या वर गेली असून, सध्या बंधाऱ्यांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हवामान केंद्राने पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.यंदा राज्यात पावसाचं आगमन लवकर झालंय. मात्र, या पावसानं राज्यातील अनेक भागांना झोडपून काढलंय. दरम्यान अशाच एका गावात अख्खा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेलाय. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गावकरी जमले आहेत आणि त्यांच्यासमोरच अवघ्या काही सेकंदांमध्ये पूल वाहून गेला आहे. यावेळी गावकरी आरडा ओरडा करतानाही दिसत आहेत. डोळ्यासमोर पूल वाहून गेल्यामुळे गावकऱ्यांनाही धक्का बसला. सुदैवानं यावेळी पुलावरची वाहतूक बंद होती. तसेच यात कुणाचा बळीही गेला नाही. दरम्यान हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

पाहा व्हिडीओ

मोसमी पावसाने नेहमीच्या वेळेपेक्षा सुमारे दोन आठवडे आधीच, रविवारी महाराष्ट्राची सीमा ओलांडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तसेच कर्नाटक, गोव्यात मोसमी पावसाचे आगमन झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. राज्यात सोमवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून वाटचालीस पोषक स्थिती असल्याने येत्या दोन-तीन दिवसांत मोसमी वारे मुंबईत धडकण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी वारे रविवारी तळकोकणात दाखल झाले. केरळमध्ये वेळेआधीच, शनिवारी दाखल झालेल्या मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्यामुळे २४ तासांच्या आत संपूर्ण गोवा व्यापून मोसमी वारे राज्यात दाखल झाले. पुढील तीन दिवसांत मुंबई, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्य व्यापले जाईल, असा अंदाज आहे.

अंदाजित वेळेपेक्षा ८ दिवस अगोदर आणि मागील १६ वर्षांच्या तुलनेत मोसमी वारे सर्वात लवकर दाखल झाले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंदाजित वेळेपेक्षा ८ दिवस अगोदर आणि मागील १६ वर्षांच्या तुलनेत मोसमी वारे सर्वात लवकर दाखल झाले आहेत. राज्यात सामान्यपणे मोसमी पाऊस सात जून रोजी दाखल होतो. मात्र, वाटचालीस पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत होते. त्यानुसार रविवारी मोसमी वाऱ्यांनी देवगडमध्ये हजेरी लावली आहे.