scorecardresearch

Video: कुस्तीत बहिणीला मार खाताना पाहून भाऊ आला पुढे, मन जिंकून घेणारी कृती

जगात आपण अनेक नातीगोती पाहतो. मात्र या साऱ्यामध्ये बहीण-भावाचं नातं अत्यंत निराळं आणि तितकंच खास असतं.

Wrestling
Video: कुस्तीत बहिणीला मार खाताना पाहून भाऊ आला पुढे, मन जिंकून घेणारी कृती

जगात आपण अनेक नातीगोती पाहतो. मात्र या साऱ्यामध्ये बहीण-भावाचं नातं अत्यंत निराळं आणि तितकंच खास असतं. त्यातच जर भाऊ मोठा असेल तर विचारायलाच नको. आपल्या बहीणीची लहानशी इच्छादेखील पूर्ण करण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. भाऊ-बहिणीचं नातं हे प्रेमाच्या नितळ अन् निखळ आठवणींनी भरलेलं असतं. अनेकदा भाऊ-बहीण घरांमध्ये एकमेकांशी भांडताना दिसतात. असं असलं तरी घराबाहेर मात्र भाऊ आणि बहीण एकमेकांचे संरक्षण करताना दिसतात. यापूर्वी असे अनेक भावनिक व्हिडीओ समोर आले असून भाऊ-बहिणीच्या नात्याची झलक पाहायला मिळते. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे अनोखे नाते पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्रामवर समोर आलेल्या या क्लिपमध्ये एक भाऊ आपल्या बहिणीला कुस्तीदरम्यान मदत करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं मन जिंकताना दिसत आहे.

हा व्हिडीओ एका कुस्ती सामन्याचा आहे. यात दोन मुली एकमेकांना कुस्तीत हरवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. शेवटी एक मुलगी दुसऱ्यावर मुलीवर वर्चस्व गाजवत तिला धोबीपछाड करताना दिसते. हे दृष्य पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या भावाला राग अनावर होतो. संतापाच्या भरात आखाड्यात उतरतो आणि दुसऱ्या मुलीसोबत भांडताना दिसतो. मात्र हा कुस्तीचा सामना असल्याचं पंच त्याला समजवतात आणि त्याला तात्काळ बाहेर घेऊन जातात.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसेच हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडियावर शेअर करत आहेत. नेटकरी या व्हिडीओखाली आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Brother came forward after beating his sister in wrestling viral video rmt

ताज्या बातम्या