Emotional video: सगळ्या नात्यांमध्ये अगदी वेगळं नातं कोणाचं असेल, तर ते भाऊ- बहिणीचं! ते दोघे एकमेकांशी भांड भांड भांडतील; पण त्या दोघांतल्या प्रेमाला कधीच ओहोटी लागत नाही. त्यांचं एकमेकांशी कधीच पटणार नाही; पण त्या दोघांच्याही मनात सातत्याने एकमेकांबद्दल मायेचा ओलावा पाझरत असतो. म्हणूनच जेव्हा लग्न करून बहीण दुसऱ्याच्या घरी जाते तेव्हा प्रत्येक भावाच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही. लहान भाऊ म्हणून मोठ्या बहिणीसोबत राहणं जरी चांगलं असलं तरी त्यापेक्षा जास्त भारी असते ते मोठा भाऊ बनून लहान बहिणीला सांभाळणे. ज्यांना लहान बहीण असते त्यांना इतर कोणत्या मैत्रिणीचीही गरज भासत नाही. दरम्यान, भाऊ-बहिणीचं प्रेम दाखविणारा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामध्ये एका भावाने आपल्या बहिणीला घर बांधण्यासाठी १५ लाख रुपये दिले आहेत. यावेळी बहिणीची रिअॅक्शन पाहून तुमचेही डोळे पाणावतील.

राखी पौर्णिमा, भाऊबीजेला बहिणीच्या ओढीने तिच्या घराकडे वळणारी पावले आता संपत्ती, मालमत्तेच्या हक्कासाठी न्यायालयाच्या दिशेने वळू लागल्याचे दिसू लागले आहे. बहिणीचे थाटामाटात लग्न लावून दिले होते. तिची सासरची सांपत्तिक स्थिती चांगली आहे. तिला आता आमच्या संपत्तीत वाटा देण्याची गरज नाही, अशा भावना आताच्या भावांमध्ये निर्माण होऊ लागल्या आहेत. काही वेळा माहेरच्या संपत्तीत वाटा मि‌ळावा म्हणून पती आणि मुलाकडून आणला जाणारा दबाव व केली जाणारी जबरदस्ती यांमुळे महिलांना इच्छा नसतानाही तसे वागावे लागते. अर्थात, काही ठिकाणी बहिणी स्वेच्छेने हक्कसोडपत्रही देतात. थोडक्यात प्रत्येक कुटुंबात याबाबतचे चित्र वेगळे आहे. मात्र, सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एका कुटुंबातील हे भाऊ-बहिणींचे प्रेम पाहून तुमचाही ऊर भरून येईल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, घरात सगळ्या बहिणी व भाऊ आणि त्यांची मुले एकत्र जमली आहेत. यावेळी बहिणीला घरासाठी पैशाची मदत करण्यासाठी भावाने माहेरी बोलावले आहे. मात्र, याची तिला काहीही कल्पना नसते. त्यानंतर भाऊ तिला बोलवतो आणि तिला १५ लाख रुपये तुला घर बांधायला घे म्हणून सांगतो. यावेळी बहिणीला अश्रू अनावर होतात. ती अक्षरश: नको नको म्हणते; मात्र भाऊ हक्काने ती रक्कम तिला देतो. बहिणी-भावामधलं हे प्रेम पाहून कुटुंबातील सर्वांनाच अश्रू अनावर होतात. व्हिडीओ पाहताना तुमचेही डोळे भरून येतील.

/

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “पुणेकरांचा नाद नाय” हेल्मेट सक्तीवर पुणेकर महिलेनं दिलं अजब उत्तर; VIDEO पाहून पोट धरुन हसाल एवढं नक्की

सोशल मीडियावर हा व्हिडीओ maharashtra_udyog_kranti नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “असा भाऊ प्रत्येकाला भेटत नसतो” तर आणखी एकानं म्हंटलंय की, “भावाला मिळालेले संस्कार फार मोठें आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ maharashtra_udyog_kranti नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हटलंय, “असा भाऊ प्रत्येकाला भेटत नसतो.” आणखी एकानं म्हटलंय, “भावाला मिळालेले संस्कार फार मोठे आहेत.”