Buffalo Saves Friend from Lion Attack Video: जंगलाचा एक नियम कायम ऐकायला मिळतो, “सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट.” म्हणजे जो ताकदवान आहे, जो चतुर आहे, तोच टिकतो. जंगलाचा राजा म्हटलं की सर्वप्रथम सिंह आणि सिंहिणींचं नाव घेतलं जातं, कारण त्यांच्या ताकदीपुढे मोठमोठी जनावरंही थरथर कापतात. मात्र, काही वेळा जंगलातील शिकार बदलते… आणि जे घडतं ते सगळ्यांना आश्चर्यचकित करून टाकतं. असाच एक हृदयाला भिडणारा आणि सस्पेन्सनं भरलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत दिसतं की एका म्हशीवर अनेक सिंहिणींनी हल्ला चढवला आहे. त्या म्हशीला जमिनीवर पाडून तिला दबोचण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. बिचारी म्हैस आपली शेवटची ताकद लावून त्यातून सुटायचा प्रयत्न करतेय, पण एकटी असल्यामुळे ती हतबल होते. तिच्या डोळ्यात भीती, पण जगण्यासाठीचा संघर्ष स्पष्ट दिसतो. असं वाटतं की आता काही क्षणांतच तिचं आयुष्य संपणार…
मात्र, इथेच सुरू होतो खरा थरार!
अचानक तिचा झुंड हरकत घेतो. आधी एक म्हैस धावून येते, मग दुसरी, मग तिसरी… आणि बघता बघता पूर्ण म्हशींचा कळप रणांगणात उतरतो. त्यांच्या अचानक हल्ल्याने सिंहिणींची अवस्था वाईट होते. थोड्याच वेळात म्हशींच्या एकतेच्या प्रचंड धक्क्यामुळे सिंहिणींना माघार घ्यावी लागते. हल्ला करणाऱ्या सिंहिणी थरथरत मागे सरकतात आणि प्राण वाचवण्यासाठी पळ काढतात.
हा प्रसंग पाहून असं म्हणावंसं वाटतं, “एक खरा मित्र कधीच साथ सोडत नाही.” एकटी म्हैस मृत्यूच्या दारात उभी असतानाच तिच्या साथीदारांनी दाखवलेलं धैर्य आणि निष्ठा हे जंगलातील खऱ्या मैत्रीचं जिवंत उदाहरण आहे.
हा व्हिडीओ एक्स (Twitter) वर @TheeDarkCircle या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. फक्त २९ सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत ६८ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला असून शेकडो लोकांनी तो लाईक आणि शेअर केला आहे.
सोशल मीडियावर लोकांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया
कोणी म्हणाले, “हीच खरी दोस्ती, जी मृत्यूच्या दारातूनही परत ओढून आणते.” तर दुसऱ्याने लिहिलं, “सिंहीण जंगलाची राणी असली तरी म्हशी झुंडीत आल्या की सगळं पलटून जातं.” अनेकांनी याला टीमवर्कची खरी ताकद म्हणत दाद दिली.
येथे पाहा व्हिडीओ
एकंदरीत, हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल, एकतेची ताकद कोणतीही परिस्थिती बदलू शकते.