Bus Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक लातूरमधला लाइव्ह अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील.
या भीषण अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. एका बस चालकाची शिक्षा बसमध्ये असणाऱ्या प्रवाशांना भोगावी लागली आहे. तुम्हीही हा व्हिडीओ पाहा आणि सांगा यामध्ये चूक कुणाची?
या व्हिडीओमध्ये पाहू शकता, रस्त्यावर अनेक गाड्यांची ये जा सुरु आहे. लोकांचीही वर्दळ दिसत आहे. अशातच भरधाव वेग एक बस येते आणि तिचं नियंत्रण सुटतं. यावेळी ड्रायव्हर अचानक ब्रेक दाबतो आणि बस पलटी होते. यामध्ये अनेक प्रवासी बसखाली चिरडल्याचे दिसत आहे. अतिघाई संकटात नेई या म्हणीचा प्रत्यय याठिकाणी आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल. हा धक्कादायक व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल. एका चुकीच्या ब्रेकमुळे काय होऊ शकतं ते या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या अपघाताची थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अतिशय अचूकपणे कैद झाले आहेत.
पाहा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/DKrUbBAvCY-/?utm_source=ig_web_copy_link
सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. bikelover_h1नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकानं म्हंटलंय, “यामध्ये सर्व चूक ही बस ड्रायव्हरची आहे, एवढ्या वर्दळीच्या रस्त्यात मुळात एवढ्या वेगात बस चावलीच कशी?” तर आणखी एकानं म्हंटलंय की, “एवढ्या वेगात असताना ब्रेक मारला तर असंच होणार ना..”