Himalayan Dangerous Road Video: हिमालयाच्या धोकादायक पर्वतरांगांमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिसतंय ते दृश्य इतकं थरारक आहे की, पाहणाऱ्याच्याही अंगावर काटा येतो. एका बाजूला खोल दरी, तर दुसऱ्या बाजूला उभा ठाकलेला विराट डोंगर आणि मध्ये फक्त एक बारीक, खडकाळ ओलसर रस्ता. त्या रस्त्यावरून डोंगराच्या कुशीत हळूहळू पुढे जातेय एक बस. बस जसजशी पुढे जातेय तसतशी प्रवाशांच्या श्वासोच्छ्वासाचा वेगही वाढतोय… आणि सगळ्यांचा विश्वास फक्त त्या ड्रायव्हरवर.

धोक्याशी रोजची झुंज

व्हिडीओमध्ये दिसणारा रस्ता इतका अरुंद आहे की, बस घसरली, तर थेट शेकडो फूट खोल दरीत कोसळण्याची भीषण शक्यता आहे. पावसामुळे रस्ता घसरडा झालेला आणि डोंगरावरून ओघळणारे झरे परिस्थिती अधिकच संकटमय करताहेत. त्यातच डोंगरावरून कोसळणारे दगड, पावसाचा पाण्याचा मारा – हे सर्व मिळून त्या बस ड्रायव्हरची खरी कसोटी घेत आहेत. या रस्त्यावर पायी चालायलाही लोक दहशतीने घाबरतात; पण तो चालक रोज शेकडो प्रवाशांना इच्छित स्थळी सुरक्षितपणे पोचवतो.

ड्रायव्हरचा धाडसी पराक्रम

या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. लोक ड्रायव्हरचं कौतुक करत आहेत आणि त्याला खरा हीरो म्हणत आहेत. कारण- एवढ्या थरारक रस्त्यावर बस चालवणं म्हणजे केवळ नोकरी नाही – ती एक धाडसी जबाबदारी आहे. एका छोट्याशा चुकीने शेकडो जीव धोक्यात येऊ शकतात; पण या ड्रायव्हरच्या कौशल्यामुळे बस सुरक्षितपणे पुढे सरकत राहते. प्रत्येक वळणावर त्याचा संयम, एकाग्रता व हातोटी पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

थरारक व्हिडीओने वाढवली धडधड

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. लोक म्हणतायतअशा, “ड्रायव्हर्सला सलाम करायला हवा. कारण- तो केवळ आपली उपजीविका नाही करत, तर प्रवाशांचे जीवपण सुरक्षित ठेवतात.” काहींनी तर त्याला “Real Hero of the Himalayas” अशी उपाधी दिली आहे.

हा प्रसंग केवळ एक व्हिडीओ नाही, तर हिमालयाच्या खडतर रस्त्यांवर रोज जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या हजारो ड्रायव्हर्सची खरी कहाणी सांगतो. साहस, भीती व जबाबदारी यांचा संगम असलेल्या या दृश्यानं लोकांना विचार करायला भाग पाडलंय – काही नोकऱ्या इतक्या धोकादायक असतात की, त्या करणाऱ्यांची खरी किंमत आपण बहुतेक वेळा विसरून जातो.

येथे पाहा व्हिडीओ

तुम्हीपण हा थरारक VIDEO पाहिलात, तर त्या ड्रायव्हरला नक्की सलाम कराल.