मधमाश्या पाळणाऱ्या एरिका थॉम्पसनने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओने ऑनलाइन जगतात एकच खळबळ उडवून दिली आहे. व्हिडीओमध्ये मधमाश्यांचे पोळे दिसत आहे. कॅप्शनमध्ये एरिका थॉम्पसन यांनी आपल्याला एक आव्हान देत हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामुळेच ही पोस्ट अजूनच मनोरंजक बनते. त्यांनी पोस्ट करताना यातल्या राणी मधमाशीला शोधण्याचे आव्हान केले आहे.
काय आहे पोस्ट?
“तुमही या पोळ्यात राणी मधमाशी शोधू शकता का? ती कामगाराच्या मधमाशांनी पूर्णपणे झाकून जाण्याआधी तुम्हाला तिला शोधण्याची गरज आहे. ” व्हिडीओ शेअर एरिका थॉम्पसन यांनी अशी कॅप्शनमधील एका भागात म्हटले आहे.
रानी मधमाशी शोधण्यासाठी मदत
नेटिझन्सना राणी मधमाशी शोधण्यात मदत करण्यासाठीही त्यांनी काही हिंट्स पोस्ट करताना दिल्या आहेत. “१. राणी मधमाशी कॉलनीतील सर्वात मोठी मधमाशी आहे आणि तिचे शरीर अधिक लांब, बारीक आहे. २. क्वीन्स विविध रंगांमध्ये येतात. या राणीचा एक सुंदर नारंगी लाल रंग आहे! ३. राणी मधमाश्यांच्या पाठीवर मोठा, टक्कल, काळा डाग असतो. ”असे त्यांनी पोस्टच्या खाली लिहल आहे. पोस्टमध्ये एक फोटो आहे जी नेटिझन्सना योग्य उत्तर देण्यास मदत करते.
नेटीझन्सकडून प्रयत्न
पोस्ट शेअर केल्यापासून त्याला २०,००० पेक्षा जास्त लोकांनी पसंती दर्शवली आहे. काहींनी मधमाशी शोधण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी प्रश्नकमेंट केले आहेत. काही लोकांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी हार्ट इमोटिकॉन्स देखील पोस्ट केले. “मधमाशी राणी मधमाशी कशी बनते? त्यांना कोणती गोष्ट राणी बनवते?” एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याने कमेंट केली. “हा माझा नवीन आवडता खेळ आहे” दुसरा वापरकर्ता कमेंट करतो. “मला वाटते की माझ्याकडे राणी मधमाशीचा डोळा आहे … मला लगेच सापडले!” असं वापरकर्ता कमेंट करतो.
तुम्हीही शोधून बघा
View this post on Instagram
इथे आहे राणी मधमाशी
राणी माशी पोळ्याच्या आणि सर्व मधमाश्यांच्या अगदी मध्ये आहे. एरिका थॉम्पसन यांनी कॅप्शनमध्ये लिहल्यानुसार राणी मधमाशीच्या पाठीवर मोठा, टक्कल, काळा डाग दिसून येत आहे. तसेच तिचे शरीर अधिक लांब, बारीक आहे.
तुम्ही शोधू शकलात का राणी मधमाशीला?