Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक चित्र खूप चर्चेत आहे. हे चित्र जरी एक असले तरी यात दोन प्राणी लपलेले आहेत. जे तुम्हाला १० सेकंदात शोधायचे आहेत. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा.

तुम्हाला या चित्रामधील दोन प्राणी दिसलेत का?

चित्रात हत्ती सहज दिसत आहे. मात्र, तुम्हाला दुसरा प्राणी दिसला का? दुसरा प्राणी दिसण्यासाठी तुम्हाला चित्र तीक्ष्ण नजरेने पाहावे लागेल. जेव्हा तुम्ही बारकाईने हे चित्र पाहाल तेव्हा तुम्हाला दुसरा प्राणी देखील सहज सापडेल. तरीही तुम्हाला दुसरा प्राणी दिसला नसेल तर आधी चित्रात दिसणारी हत्तीची सोंड बघा, कदाचित तुम्हाला इथे एक हिंट मिळेल. आता तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल उलटा करून पाहायचा आहे. त्यानंतर लगेच तुम्हाला दुसरा प्राणी दिसेल. तुम्हाला एक सुंदर हंस दिसेल ज्याचे अर्धे पंख उघडे आहेत.

( हे ही वाचा: Optical Illusion: या चित्रात लपलेले ५ पक्षी तुम्ही शोधू शकता का? फक्त १% लोकांनी दिले अचूक उत्तर)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्राचा वापर जाहिरातीसाठी देखील करण्यात आला आहे

ही ऑप्टिकल भ्रमचे चित्र खूप लोकप्रिय आहे. खरं तर, हे चित्र ओरिजनली जीपने त्याच्या जाहिरात मोहिमेसाठी वापरले होते. या सुपर जाहिरात मोहिमेने जाहिरात इंडस्ट्रीमध्ये तुफान गाजले होते. अशा इतर दोन प्रतिमांसह, ही संपूर्ण जाहिरात मोहीम लिओ बर्नेट या सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय जाहिरात संस्थेने तयार केली होती.