scorecardresearch

Premium

Optical Illusion: या चित्रात लपलेले ५ पक्षी तुम्ही शोधू शकता का? फक्त १% लोकांनी दिले अचूक उत्तर

ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

Can you spot the 5 birds hidden in this picture?
photo(source: social media)

Optical Illusion: सोशल मीडियावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडं खूप चर्चेत आहे. या चित्रात एक झाड आहे. या झाडात लपलेले पाच पक्षी तुम्हाला शोधायचे आहेत. आतापर्यंत अनेक जणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा.

या व्हायरल झालेल्या कोड्यातील चित्रामध्ये एक झाड आहे आणि त्या झाडात पाच पक्षी लपले आहेत. हे पक्षी तुम्हालाच शोधावे लागतील. हे एक मोठे आव्हान आहे, कारण जर तुम्ही याकडे एका नजरेने पाहिले तर ते एखाद्या झाडासारखे दिसते, परंतु जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिले तर तुम्हाला त्यात काही पक्षी देखील दिसतील. हे पक्षी शोधण्यासाठी तुम्हाला भरपूर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

bobby-deol-birthday-special
विजय सिंग देओल ते लॉर्ड बॉबी; कमबॅक कसं असावं हे दाखवून देणाऱ्या ज्युनिअर देओलचा थक्क करणारा प्रवास
Optical Illusion
Optical Illusion : या फोटोमध्ये लपलाय बेडूक, ९९ टक्के लोकांना दिसणार नाही; तुम्हाला दिसतोय का?
Meta Facebook
‘मेटा’वर दररोज एक लाख मुलांचे होते लैंगिक शोषण; तुमची मुले सुरक्षित आहेत का?
Devil Lemon Cut With Tons Of Lemons Inside 25 Million People Got Scared Looking at Weird Fruit Grown in Tree Watch video
Video: लिंबू कापला आणि विश्वासच बसेना! दोन कोटींहून अधिक लोक घाबरून म्हणू लागले, “भयंकर फळ, तुम्ही आधी..”

( Optical Illusion: लाल ठिपके जोडल्या नंतर तुम्हाला इंग्रजी अक्षर दिसले का? फक्त १% लोकांना देता आलं योग्य उत्तर)

तुम्हाला पक्षी दिसले का?

( हे ही वाचा: Optical Illusion: चित्रामधील लपलेले ९ चेहरे तुम्ही शोधू शकता का? ९९% लोकं ठरलीत अपयशी)

जर तुम्हाला चित्रात लपलेला कोणताही पक्षी दिसत नसेल, तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. त्यात एक कोंबडा, एक कोंबडी आणि तीन पिल्ले लपलेली आहेत. चला तर मग ते पटकन शोधा आणि तरीही सापडले नाही तर आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू. जर तुम्ही नीट पाहिले तर झाडाच्या उजव्या बाजूला मध्यभागी एक कोंबडी आहे, तर अगदी मध्यभागी एक कोंबडा आहे आणि त्याच्या पुढे एक पिल्लू आहे. तर दुसरे पिल्लू वरच्या उजव्या बाजूला आहे, तर तिसरे पिल्लू खालच्या डाव्या बाजूला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Can you spot the 5 birds hidden in this picture gps

First published on: 17-08-2022 at 18:22 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×