Driving viral video: गाडी चालवायला सगळ्यांनाच आवडतं. तर काही लोकांचं गाडी चालवणं हे स्वप्नही असतं. तुम्हीही बऱ्याच वेळा एकलं असेल की गाडी चालवणं सोपं असतं पण योग्य पद्धतीत गाडी पार्क कर करणं किंवा युटर्न घेणं तसं कठीण असतं. काहीवेळा गाडी अशा जागेत अडकते की इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती होते. असाच एक ड्रायव्हर सध्या अशाच परिस्थितीत अडकला आहे. गाडीच्या एका बाजूला खोल दरी आहे तर दुसऱ्या बाजुला डोंगर. अशा परिस्थितीत युटर्न घ्यायचा कसा? व्हिडीओ पाहा आणि सांगा तुम्हीच..

या व्हिडीओमध्ये तुम्ही त्याच्या एका बाजूला डोंगराची भींत आह तर दुसऱ्या बाजूला खोल दरी. त्याने यावेळी थोडीज जरी चूक केली तरी तो गाडीसह थेट दरीत कोसळू शकतो. अशा स्थितीत युटर्न घ्यायचा कसा. मात्र एवढ्या छोट्या रस्त्यावर सुद्धा हा ड्रायव्हर बिनधास्तपणे गाडी टेकडीवर पुढे मागे करत आहे. यादरम्यान तुम्हाला कारचा संपूर्ण मागचा टायर हवेत दिसत असेल, परंतु ड्रायव्हर बरोबर डोक वापरुन कार काढण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटी अनोख्या पद्धतीने तो युटर्न घेऊन दाखवतोच. हा थरारक व्हिडीओ पाहताना तुम्हीही श्वास थांबवून ठेवाल.

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच ड्रायव्हरचंही लोक कौतुक करत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ई.. किती ते किळसवाणं; “पाणीपुरी खायची ही कोणती पद्धत?” म्हणत नेटकरी संतापले; VIDEO होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @desimojito या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत. “ड्रायव्हर प्रो मॅक्स” अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.