Cardamom Farming : वेलचीचे भारतीय जेवणात अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेलची पदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी वापरली जाते. वेलची घालून केलेला चहा चवीला अप्रतिम वाटतो. वेलचीचे अनेक गुणकारी फायदे आहेत. वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात जे स्नायूंना मजबूत करण्यास मदत करतात. वेलचीचे असे असंख्य फायदे आहेत पण तुम्हाला वेलचीची शेती कशी करतात हे माहिती आहे का? सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण वेलचीच्या लागवडीविषयी माहिती सांगताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओत हा तरुण सांगतो, “वेलचीची शेती ही फक्त केरळमध्ये केली जाते आणि ती सुद्धा फक्त पहाडी भागात होते. कारण वेलचीच्या शेतीला भरपूर पाऊस आणि दमट वातावरणाची गरज असते त्यामुळे अशाच ठिकाणी वेलचीची शेती केली जाते.”
पुढे हा तरुण वेलचीच्या एका प्रकाराविषयी सांगतो, “नल्लानी वेलची, २५०० रुपये प्रति किलो असा दर या वेलचीचा आहे. वेलचीच्या एका झाडापासून येथील शेतकरी आठ ते दहा हजार रुपये कमवत असतो.”
हा तरुण केरळमध्ये आहे आणि वेलचीच्या एका झाडाखाली बसून तो हा व्हिडीओ करतोय. या व्हिडीओत तो झाडाला लागलेली कच्ची वेलची सुद्धा दाखवतो. तो व्हिडीओत सांगतो की एका झाडापासून वर्षातून ४-५ किलो वेलचीचे उत्पादन निघते.

हेही वाचा : १४ लाख दिव्यांपासून साकारली श्रीरामाची प्रतिमा, व्हिडीओची सगळीकडे चर्चा; पाहा व्हायरल व्हिडीओ

या व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे, वेलचीची शेती फक्त केरळमध्ये केली जाते. पण हल्ली महाराष्ट्र, कोकण , कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये सुद्दा वेलचीची शेती केली जाते. फक्त वेलचीची लागवड करण्यासाठी किमान १० अंश सेल्सिअस आणि कमाल ३५ अंश सेल्सिअप तापमान असावे लागते. जर घरीच अशा पद्धतीने वेलचीची शेती केली तर फक्त एका झाडापासून तुम्ही दहा हजार रुपये कमावू शकता.हा एक उत्तम व्यवसाय आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

indianfarmersanju या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “एका झाडापासून १० हजार रुपयांची वेलची” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी प्रश्न सुद्धा विचारली आहेत. एका युजरने विचारलेय, “बियाणे कुठे मिळेल?” तर एका युजरने लिहिलेय, “एकदम मस्त माहिती दिली” आणखी एका युजरने लिहिलेय, “भाऊ, मी जुन्नरची आहे आम्ही पण वेलचीची शेती करतोय.”