सोशल मीडिया व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. त्यात प्राण्यांच्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक लोकांनी चांगले आरोग्य आणि तंदुरुस्त शरीर बनवण्यासाठी संकल्प केला होता. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी काही जण व्यायाम करत आहेत, तर काही जणांनी आठवड्याभरात व्यायाम सोडून दिला. मात्र एक मांजर युजर्संना तंदुरुस्त शरीर बनवण्यासाठी प्रेरित करताना दिसत आहे. एक व्हिडीओ गेल्या दिवसात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक मांजर व्यायामशाळेत घाम गाळताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी मजेशीर अंदाजात प्रतिक्रिया देत आहेत. तसेच हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये जिममध्ये एक मांजर घाम गाळताना दिसत आहे. जिथे ती जमिनीवर पडून सिट-अप्स करताना दिसत आहे. या दरम्यान एक व्यक्ती तिला हे करण्यास प्रवृत्त करते आणि मोजणी करते. मांजर देखील त्याला प्रतिसाद देत सलग २० सिट-अप्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजर्सने लिहिलं आहे की, ‘ही मांजर लवकरच बारीक होईल आणि एब्स पडतील’. तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, ‘माझा व्यायाम पण तूच करा मला काही जमत नाही.’
फेसबुक या सोशल मीडिया साइटवर या व्हिडीओला १.२ कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी हा व्हिडीओला लाइक्स दिले आहेत. अजूनही लोक हा व्हिडीओ पाहत कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव करत आहेत.