सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हायरल झालेले अनेक गोंडस व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये चक्क मांजरीचा हेअरकट करण्यात येत आहे. तुम्हाला या गोष्टीचे नक्कीच आश्चर्य वाटेल की हेअरकट करण्यासाठी मांजर एका ठिकाणी स्थिर कशी बसली? पण या व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की मांजर अगदी स्तब्ध बसली आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : अजबच! सरकारी अधिकाऱ्यापुढे कुत्र्यासारखा भुंकू लागला हा माणूस; कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क

अगदी माणसांप्रमाणे या मांजरीला एपरन घातलेले दिसत आहे. हेअरड्रेसर कैची आणि कंगव्याचा वापर करत केस कापत असताना मांजर शांत बसलेली आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरीही अचंबित झाले आहेत. ‘केऑटिक कॅट पीक्चर्स अँड व्हिडीओज’ या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला २८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मांजरीला इतके शांत बसलेले पाहून अनेकांनी कमेंट्समध्ये आश्चर्य व्यक्त केले आहे. तर काहींनी या गोंडस व्हिडिओचे कौतुक केले आहे.