रशिया-युक्रेन दरम्यानच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक देश आणि आंतरराष्ट्रीय संघटना रशियावर अनेक निर्बंध लादत आहेत. यामध्ये आता रशियन प्रजातीच्या मांजरींचा देखील समावेश झाला आहे. मांजरींशी संबंधित असलेल्या फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फेलाइन्स (FIFe) ने रशियन जातीच्या मांजरांच्या निर्यात आणि नोंदणीवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. मांजरींवरील हे निर्बंध ३१ मेपर्यंत लागू असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फेडरेशन इंटरनॅशनल फेलाइन (FIFe) च्या कार्यकारी मंडळाने या संदर्भात एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला धक्कादायक आहे. या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. हजारो लोकांना आपले घर सोडून जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे भटकावे लागत आहे. हे भयानक दृश्य सर्वजण पाहत आहेत. हे लक्षात घेऊन आम्ही काही निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे.

पुतिन यांचं युक्रेननंतरचं टार्गेट ठरणार ‘हा’ देश; बेलारुसच्या राष्ट्रपतींनी चुकून उघड केलं गुपित

फीफने एका निवेदनात म्हटले आहे की ते हे अत्याचार पाहू शकत नाहीत. त्यामुळे १ मार्चपासून कोणत्याही जातीची मांजर रशियाबाहेर पाठवण्यासाठी नोंदणी करता येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बोर्डाने सांगितले की, १ मार्चपासून रशियन जातीच्या कोणत्याही मांजरीची आयात केली जाणार नाही. एवढेच नाही तर आता रशियाबाहेरील फेडरेशनच्या पेडिग्री बुकमध्ये कोणत्याही रशियन मांजाची नोंद होणार नाही.

कोण आहे पुतिन यांची कथित गर्लफ्रेंड? जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी

विशेष म्हणजे २४ फेब्रुवारीला रशियन सैन्याने युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू केली. याच्या तीन दिवसांनंतर रशियाने युक्रेनमधील डोनेस्तक आणि लुहान्स्क या दोन स्वतंत्र देशांना मान्यता दिली. तेव्हापासून दोन्ही देशांमधील वाद वाढला आहे. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि युरोपियन युनियनसह अनेक देशांनी रशियाच्या या कारवाईचा निषेध केला आहे. यासोबतच रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनला लष्करी मदत करण्याचे आश्वासनही या देशांनी दिले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cats suffer huge losses due to russia ukraine war this is the reason pvp
First published on: 03-03-2022 at 11:03 IST