प्रत्येक भारतीयांसाठी १४ जुलै २०२३ हा अभिमानाचा दिवस होता. तब्बल चार वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चांद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण झाल्याने प्रत्येक देशवासीयांचे ह्रदय अभिमानाने भरून आले. यामुळे जगात भारताचा दर्जा आणखी वाढला. कारण याआधी हातावर मोजण्या एवढेच अशाप्रकारचे यान अवकाशातून यशस्वीरित्या पाठवू शकले. या देशांमध्ये आता भारताचेही नाव असणार आहे. जिथे भारताने एवढी मोठी कामगिरी केली, तिथे पाकिस्तान कसा मागे राहील. भारताशी स्पर्धा करण्यासाठी पाकिस्ताननेही आपले चांद्रयान प्रक्षेपित केल्याचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात पाकिस्तानची खिल्ली उडवण्यात आली आहे. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावरील कॅप्शन वाचून तुम्हीही पोट धरून हसाल.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रॉकेटच्या आकाराचा एक कापडी बलून आहे, जो पाकिस्तानचे चांद्रयान असल्याचे वर्णन केले आहे. हा बलून हवेत उडल्यानंतर एकप्रकारे पाकिस्तानचे चांद्रयान प्रक्षेपित झाल्याचे म्हणत खिल्ली उडवली जात आहे. हा एक बलून लॉचिंगचा व्हिडीओ आहे. जो आता पाकिस्तानचे चांद्रयान म्हणून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘पाकिस्तानचे चांद्रयानही प्रक्षेपित झाले’

बस्स एवढं श्रीमंत व्हायचयं! चक्क ‘फरारी’वर घोड्याला खायला दिला चारा, Video पाहून व्हाल थक्क

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ खूप जुना आहे. जी पुन्हा शेअर केला जात आहे. भारताच्या ‘चांद्रयान-३’ लाँचचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करत पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक रॉकेटच्या आकाराचा एअर बलून हवेत उडवताना दिसत आहेत. त्याला पाकिस्तानचे चांद्रयान म्हणत त्याची खिल्ली उडवली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्येकजण हा व्हिडिओ पाहण्याचा आनंद घेत मजेशीर कमेंट्स करत आहे. काहीजण याला ‘पाकिस्तानचे ‘मिशन इम्पॉसिबल’ म्हणत आहेत तर काहीजण ‘पाकिस्तानचे चांद्रयान असे असू शकते’ असे म्हणत आहेत. एका यूजरने तर ‘पाकिस्तान फक्त दहशतवाद्यांना सोडू शकतो’ असे लिहिले आहे. तर एकाने पाकिस्तानच्या गरिबीचा उल्लेख करताना लिहिले की ‘त्याच्या जीडीपीचा अर्धा भाग हे बनवण्यात खर्च झाला असेल.’