Viral Video: मॅकडोनाल्डमध्ये आवडीने बर्गर, फ्राइज खाणं लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांना आवडतं. बर्गरचे मांसाहारी-शाकाहारी असे विविध प्रकार आहेत. पण, तुम्ही कधी १०० किलोचा बर्गर पाहिला आहे का? नाही, तर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात शेफ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून हा अनोख्या पद्धतीत बर्गर बनवला आहे; जो शंभर किलोचा आहे.
शंभर किलोचा बर्गर आग्रा येथे काही शेफ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून बनवला आहे. सुरुवातीला टेबलावर ताटात सगळ्यात पहिला एक मोठा बन ठेवला आहे. त्यानंतर त्यावर फ्रेंच फ्राइज (बटाट्याचे तळलेले काप) टाकून घेतले. त्यानंतर त्यावर सॉस, काही मसाले टाकून घेतले आहेत. त्यानंतर लेट्यूस ग्रीन (हिरवी पाने) टाकण्यात आली आहेत आणि नंतर बनवर काठ्या लावून घेतल्या आहेत. त्यानंतर या काठ्यांच्या सहाय्याने आणखीन एक बन लावून दुसरा थर बनवून घेतला. तसेच या दुसऱ्या बनवर अनेक आलू टिक्की (आलू टिक्की-जो बर्गर या पदार्थाच्या आतमध्ये असते) ठेवण्यात आल्या आहेत व सॉस घालून त्यावर तिसरा बन लावून घेतला. कशा प्रकारे शंभर किलोचा बर्गर बनवला जातो आहे, एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.
हेही वाचा… जेवणातील जास्तीचं तेल काढण्याचा हटके जुगाड, ‘असा’ करा बर्फाचा वापर; Viral Video पाहून व्हाल थक्क!
व्हिडीओ नक्की बघा :
शंभर किलोचा बर्गर बनवला :
तसेच तिसऱ्या थरावर म्हणजेच तिसऱ्या बनवर मेयॉनीज, काकडी, टोमॅटोचे तुकडे ठेवले आणि वरून टोमॅटो सॉस घालून घेतला आहे. त्यानंतर चौथा आणि पाचवा थर बनवून घेतला आणि त्यावर चीज आणि पुन्हा वर आलू टिक्कीची सजावट करून घेतली आहे आणि अशाप्रकारे १०० किलोचा बर्गर बनवण्यासाठी पाच थर बनवून घेऊन त्याची सजावट करण्यात आली आहे, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @tasteoftravel या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या युजरचे नाव हिमांशु आहे, जो एक व्हिडीओ क्रिएटर आहे. तसेच त्याने आग्र्यामध्ये उपस्थित राहून या अनोख्या शंभर किलोच्या बर्गरचा व्हिडीओ शूट केला आहे. तसेच काही जण व्हिडीओ पाहून म्हणत आहेत की, अन्नाची नासाडी करण्यात आली आहे. पण, या १०० किलो बर्गरचे शाळेतील २०० विद्यार्थ्यांना वाटप केले आहे, असे कमेंटमध्ये युजरने नमूद केलं आहे.