चेन्नईतील टीपी चतरम भागातील स्मशानभूमीत मुसळधार पावसात बेशुद्ध पडलेल्या एका व्यक्तीला पोलिस निरीक्षक राजेश्वरी वाचवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.व्हिडीओमध्ये, पोलिस निरीक्षक त्या व्यक्तीला तिच्या खांद्यावर घेऊन ऑटोकडे जात असताना दिसत आहे. ती त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाण्यास मदत करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलीस निरीक्षक राजेश्वरी यांच्या निस्वार्थ कृत्याबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अहवालात असे म्हटले आहे की २८ वर्षीय व्यक्ती स्मशानभूमीत बेशुद्ध अवस्थेत आढळून आली, कारण गुरुवारी तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे चेन्नईच्या अनेक भागात पूर आला. एग्मोर आणि पेरांबूर सारख्या ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे पोलिसांनी सांगितले.

( हे ही वाचा: VIDEO: महिला साड्यांची खरेदी करत असतानाच बाईक दुकानात घुसली अन्…; थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद )

नेटीझन्सकडून झालं कौतुक

हा व्हिडीओ पोस्ट केल्यापासून जवळ जवळ १५ हजार लोकांनी बघितला आहे. लोकांनी या लेडी सिंघमचं कौतुक केलं आहे. “शूर महिला इन्स्पेक्टरला सलाम”, “या मानवतेला सलाम”, “ती प्रेरणा आणि समर्पणाचा स्रोत आहे.” अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत.

( हे ही वाचा: एकेरी धाव घेण्यास नकार देणाऱ्या डॅरिल मिशेलने आपल्या वक्तव्यानं जिंकली चाहत्यांची मनं; म्हणाला, “मला वाद…” )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तामिळनाडूच्या महसूल विभागाचे प्रधान सचिव कुमार जयंत यांनी सांगितले की, पावसाशी संबंधित घटनांमध्ये शनिवारपासून १२ जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या एक दबावामुळे गुरुवारी संध्याकाळी उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेश, चेन्नई आणि उपनगरात येथे अतिवृष्टी झाली.