डान्सर गौतमी पाटील तिच्या हटके नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे तिच्या कार्यक्रमात होणाऱ्या राड्यांमुळेही ती चर्चेत असते. आता छोटा पुढारी अशी ओळख असलेल्या घनश्याम दरोडेने गौतमी पाटीलला महाराष्ट्राचा बिहार करू नको म्हणत इशारा दिला आहे. विशेष म्हणजे घनश्याम दरोडेने गौतमीवर बोलताना अजित पवारांचंही नाव घेतलं. त्याच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

घनश्याम दरोडे म्हणाला, “सबसे कातिल गौतमी पाटील घायाळ झाल्याशिवाय राहणार नाही. गौतमी पाटील यांनी महाराष्ट्राचा बिहार करू नये. आपली लावणी ही लावणी ठेवा. त्याला अश्लीलतेचा रंग देवू नका. लावणी वगळता इतर अश्लीलतेचा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही.”

Eknath Shinde and Aditya thackeray
“महाराष्ट्राच्या बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांची पीआर टीम इन्फ्लुअन्सर्स आणि…”, आदित्य ठाकरेंचा दावा; आव्हान देत म्हणाले…
Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
Devendra Fadnavis Special Post For Raj Thackeray
महायुतीला पाठिंबा देताच देवेंद्र फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार, म्हणाले, “भक्कम महाराष्ट्राच्या..”
Sanjay Raut talk about Monopoly of mp and mla in Western Maharashtra in sangli
पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकांना आपलीची मक्तेदारी असे वाटते- संजय राऊत

“अश्लीलता दाखवून फेमस होऊ नका”

“माझा आणि गौतमी पाटीलचा कोणताही वाद नाही, मात्र लावणी बदनाम होऊ नये म्हणून आपण इशारा दिला. तुम्हाला फेमस व्हायचं असेल, तर तुमच्या कर्तुत्वावर जरूर व्हा. चुकीच्या पद्धतीने अश्लीलता दाखवून फेमस होऊ नका,” असं घनश्याम दरोडेने म्हटलं.

“वाकडेतिकडे चाळे करून तुम्ही…”

“वाकडेतिकडे चाळे करून तुम्ही डान्स केला, तर येणाऱ्या पिढीवर काय संस्कार होतील?” असा प्रश्न घनश्याम दरोडेने विचारला.

“अजित पवार चुकीचं बोलले नाहीत”

घनश्याम दरोडे पुढे म्हणाला, “अजित पवारांनी भाषणात सांगितलं की, गौतमी पाटलांना बोलवा. ते कुठेही चुकीचं किंवा वाईट बोललेले नाहीत. त्यामुळे कोणी टेंशन घेऊ नये.”

हेही वाचा : “तिला ३ गाण्यांना ३ लाख, आम्हाला टाळ वाजवून काही नाही”, इंदुरीकर महाराजांवर गौतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

“कुणाच्या बुडाखाली किती आमदार आहे हे समद्यांना माहितीये”

“गौतमी पाटलांना महाराष्ट्रात त्यांची क्रेज कायम टिकून ठेवायची असेल, तर चांगला कार्यक्रम आणि चांगला डान्स करावा लागेल,” असंही घनश्याम दरोडेने म्हटलं. राजकारणावर बोलताना कुणाच्या बुडाखाली किती आमदार आहे हे समद्यांना माहितीये, असं म्हणत घनश्याम दरोडेने टोला लगावला.