सोशल मीडियावर नेहमी अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात. तर काही व्हिडिओ बघून अंगावर काटा येतो. लहान मुलांवर खेळताना फार लक्ष ठेवणं आवश्यक आहे. बऱ्याचदा खेळतानाच मुलं जखमी होण्याची शक्यता जास्त असते. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकदा आपण चित्रपटांमध्ये अशी दृश्य पाहतो. मात्र ही दृश्य चित्रपटातील नाही तर, रिअल लाईफमधील आहे.

देव तारी त्याला कोण मारी याचाच प्रत्यत युपीच्या गोरखपूरमध्ये पाहायला मिळाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक लहान मुलगा खेळक असताना अचानक कार येते आणि त्याला उडवते, कारचं मागचं चाकही लहानग्याचा अगंवारुन जातो. मात्र पुढच्याच क्षणी हा मुलगा उठून उभा राहतो. या अपघातात त्याला काहीही इजा होत नाही. लोकांना वाटलं की आता मूल जगणार नाही. पण काही क्षणातच गाडी पुढे गेल्यावर मुलगा स्वतःहून उभा राहिला. मुलाला पाहिल्यानंतर त्याला काहीही झालेले नाही.हा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक याला चमत्कार म्हणत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – घर सोडून गेलेला मुलगा वर्दीत परतला, आईच्या अश्रूंचा बांध फुटला, भावनीक Video व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हा.रल होत असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत. नेटकरीही हा अपघात बघून अवाक झाले आहेत. तर पालकांनी मुलांकडे व्यवस्थित लक्ष देण्याचं आवाहन नेटकरी करत आहेत.