Mother Son Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका लहान निष्पाप मुलाचा त्याच्या आईसोबत अभ्यास करतानाचा व्हिडिओ कमालीचा व्हायरल होतोय. मात्र, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक संतापले आहेत. ही महिला मुलाला ज्या पद्धतीने शिकवत आहे आणि त्यावर त्या मुलाचे रडणे पाहून नेटकरी जोरदार टीका करत आहेत. यावर नेटकरी म्हणतात की मुलाला रागाच्या ऐवजी प्रेमाने समजावून शिकवले पाहिजे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वहीवर १,२,३… लिहिताना आईच्या मारहाणीमुळे हा मुलगा खूपच घाबरला आहे.

”आई मला मारू नको अग…”

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हा लहान मुलगा आईसोबत शिकत असल्याचे दिसत आहे. पण १ ते १० पर्यंतचा आकडा लिहिताना तो आपल्या आईचा मार मिळणार या भीतीने खूप घाबरलेला दिसत आहे. या लहान मुलाचे डोळे अश्रूंनी भरले आहेत. आपण अंक लिहिताना काही चूक केली तर कदाचित आई आपल्याला मारेल अशी भीती त्याला वारंवार वाटत आहे. तेव्हा तो मुलगा रडत रडत आईला विचारतो ” तू मला मारणार नाही ना?” यानंतर तो आपल्या आईचे मोठ्या प्रेमाने आईच्या कपाळाचे चुंबन घेतो. त्यावर त्याची आई म्हणते ‘का रडतोस’? व्हिडिओच्या शेवटी महिला आपल्या मुलाचे अश्रू पुसताना दिसत आहे.

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: Video: धबधब्याखाली खेळत असताना पर्यटकांवर काळाने घातला घाला; क्षणात डोळ्यासमोर सगळे पाण्यात…)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिनी चंदन द्विवेदी नावाच्या युजरने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ६० लाख वेळा पाहिला गेला आहे, तर ४ लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. तसंच अनेकजण यावर आपल्या वेगवेगळ्या कंमेंट करत आहेत. बहुतेक वापरकर्ते महिलेला धमकी देऊन मुलाला अशाप्रकारे शिकवल्याबद्दल शिव्या श्राप देत आहेत.