लहान मुलं खूपच गोंडस असतात. त्याच वेळी, मुले कधीकधी असे कृत्य करतात, जे हृदयाला स्पर्श करून जातात. त्याच बरोबर मुलं सुद्धा भावूक होतात, त्यांना त्यांच्या भावना शब्दात व्यक्त करता येत नसलं तरी त्यांच्या डोळ्यात ते भाव झळकू लागतात. अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला आपल्या वडिलांसोबतचा व्हिडीओ पाहताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून चिमुकला भावूक होतो आणि त्याच्या डोळ्यात अश्रू तरंगू लागतात.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक रडणारा लहान मुलगा दिसत आहे. तो कशामुळे रडत असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर त्याच्या वडिलांनी फादर्स डे च्या दिवशी एक व्हिडीओ मॉन्टेज बनवला होता आणि तो आपल्या मुलाला दाखवला. हा व्हिडीओ दोघे पाहत असताना या लहान मुलांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. व्हिडीओकडे तो एकटक पाहताना दिसतोय आणि मध्येच तो आपल्या वडिलांकडे पाहून भावूक होताना दिसतोय. त्याच्या भावना चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकताना दिसत आहेत. या चिमुकल्याचा पडलेला चेहरा पाहून लोकही भावूक होताना दिसत आहेत.

आणखी वाचा : पक्ष्यांच्या जीवनातील ५१ दिवस दाखवणारा VIDEO VIRAL, २१ मिलियन लोकांनी पाहिला व्हिडीओ

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : अरेरे हे काय…चोराने चक्क रस्त्यावरच्या गटाराचं कव्हरंच पळवलं, पाहा VIRAL VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ मॅजिकली न्यूज नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात पाहत असून या व्हिडीओला आतापर्यंत १ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख ५९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. या व्हिडीओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. काहींनी या चिमुकल्याच्या भावनेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काहींनी बाप-लेकामधल्या बॉण्डिंगचं कौतूक केलंय.