Child Funny Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यातील काही व्हिडीओ हे अनेकांची लक्ष वेधून घेतात. त्यात अनेकदा लहान मुलांचे व्हिडीओ असतात, ज्यात लहान मुलं असे काही कारनामे करत असतात की ते पाहून हसू आवरणं अवघड होतं. सध्या असाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, जो पाहून खरंच लहान मुलांचा काही नेम नाही, असंच म्हणावं लागेल. अनेकांना हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपले बालपण आठवेल. नेमकं यात चिमुकल्यानं काय केलं ते पाहू….
लहान मुलांच्या प्रत्येक कृतीकडे बारीक लक्ष ठेवून राहावं लागतं; अन्यथा ती कधी काय करतील याचा नेम नाही. अनेकदा ही मुलं घरात अशा काही उचापती करुन ठेवतात की, आईला त्या आवरता आवरता नाकीनऊ येतात. या व्हिडीओतही एक चिमुकला असाच काहीसा प्रताप करताना दिसतोय.
चिमुकल्याने आईच्या जॅकेटबरोबर केला भलताच कारनामा
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकला आपल्या आईसह स्कुटीवर बसून कुठेतरी जात आहे. सिग्नलवर स्कुटी थांबली आहे. त्याच वेळी मागे बसलेला चिमुकला मात्र त्याचे कारनामे करण्यात व्यग्र आहे. तो आईचे जॅकेट कशाने तरी फाटतो आणि त्यातून कापूस काढून आरामात हवेत उडवतोय… तो त्याच्या कृतीतून खूप आनंद घेतानाि दिसतोय.
हा व्हिडीओ कधी आणि कुठला आहे याची माहिती मिळू शकलेली नाही; परंतु चिमुकल्याच्या मजेशीर कृतीमुळे तो व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. अनेकांना हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांच्या बालपणीच्या खोडसाळ कृत्यांची आठवण होत आहे.
चिमुकल्याचा हा मजेशीर व्हिडीओ @Dheerusingh25 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडrओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद असतो.’ दरम्यान, अनेक जण व्हिडीओवर कमेंट्ससुद्धा करतायत. एकाने लिहिले की, तुम्हाला प्रत्येक गोष्टीत आनंद मिळाला पाहिजे. दुसऱ्याने लिहिले की, बरोबर म्हटले, आनंदी असले पाहिजे. तिसऱ्याने लिहिले की, आता घरी जाऊन तो खूप मार खाईल.