‘मुलं ही देवाघरची फुलं’ असं म्हटलं जातं. कारण त्यांच्या निष्पाप कृतीतून ते वारंवार दिसून येतं. शिवाय ते आपणाला योग्य अयोग्य वाटेल स्पष्टपणे बोलून टाकतात. त्यांचं स्पष्ट बोलणं अनेकांना आवडतं शिवाय कधीकधी त्यांच्या स्पष्ट आणि खरं बोलण्यामुळे अनेकांना फायदा होतो तर कोणातं नुकसानही होतं. असे आपण अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. ज्यामध्ये पालकांना काही खोटं बोलायचं असतं पण मुलाच्या खरे बोलण्यामुळे त्यांचा खोटेपणा उघडकीस येतो. त्यामुळे लहान मुलांवर योग्य ते संस्कार होणं गरजेचं असते. शिवाय ते जे आपल्या आजुबाजूलाघडतं तसंच बोलतात आणि वागतात.

सध्या अशात एका चिमुकल्याच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. जो पाहून अनेकजण पोट धरुन हसत आहेत. हो कारण देशभरात नुकताच ७४ वा प्रजासत्ता दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. या दिवशी अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिनाचे महत्व, इतिहास सांगणारी भाषण झाली. याच दिनानिमित्त एका लहान मुलाने अतिशय तुफान असं भाषण केलं आहे. जे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जे ऐकल्यावर तुम्हीही त्याने सांगितलेल्या लोकशाहीच्या व्याख्येचं समर्थन कराल यात शंका नाही.

हेही पाहा- “बाप तो बापच” रेल्वे स्टेशनवर मुलाला निरोप द्यायला आलेल्या वडिलांचा भावूक Video पाहून नेटकरीही भारावले

खरंतर प्रजासत्ताक दिनाला आपण संविधान स्विकारलं आणि तेव्हापासून सर्व लोकांना विविध मुलभूत अधिकार प्राप्त झाले. आपण अनेकदा कोणतीही गोष्ट कराताना संविधानाने मला ते करण्याचा हक्क दिल्याचं सांगतो. असाच हा चिमुरडाही त्याच्या संवैधानिक हक्काचं कसं आणि कोणाकडून उल्लंघन केलं जातं, हे अतिशय उत्तम आणि प्रामाणिकपणे सांगताना दिसत आहे.

हेही पाहा- धीरेंद्र कृष्ण महाराजांचा नवा अवतार आला समोर; व्हायरल Video पाहताच समर्थक म्हणाले, “गुरुदेव पुन्हा…”

तो आपल्या भाषणात म्हणतो की, खरंतर आज लोकशाही दिन आहे. आजपासून लोकशाही सुरु झाली, मला लोकशाही खूप आवडते. कारण लोकशाहीमध्ये तुम्ही काहीही करु शकता, प्रेमाने राहू शकता भांडू शकता. पण मला मोक्कार धिंगाणा करायला, माकडासारखे झाडावर उड्या मारायला, फिरायला खूप आवडते. पण माझे बाबा मला कधीही मारत नाहीत, कारण ते लोकशाही मानतात. मात्र, माझा गावातली लहान मुलं माझं नावं सरांना सांगतात आणि सर मला पायदळी तुडवतात असं तो आपल्या भाषणात सांगत आहे,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे भाषण ऐकल्यावर तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. शिवाय तो शेवटी माझ्यासारखा गरीब मुलगा आख्या तालुक्यात आढळणार नाही असंही म्हणत आहे. या मुलाच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये मजेशीर कमेंट केल्या आहेत. कोणी हा नक्कीच भावी राजकारणी होणार म्हटलं आहे. तर काहींनी यालाच धमक म्हणतात असं म्हटलं आहे.