९० च्या दशकात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला ‘विनी द पू’ हे कार्टुन कॅरेक्टर चांगलंच ठावूक असेल. विनीला कोण कसं विसरू शकतं? आजही अनेक मुलींच्या आवडत्या कार्टुन कॅरेक्टर्सच्या यादीत विनी असेल. विनीचे किचेन, स्टिकर्स, स्टफ टॉईज पासून एकूण एक छोट्या मोठ्या गोष्टी मुलींकडे  उपलब्ध असतील. अशा सगळ्यात गोंडस विनी या कार्टुन कॅरेक्टरला चीनच्या सोशल मीडियावर कायमची बंदी घालण्यात आलीय आणि याचं कारण ऐकाल तर तुम्ही डोक्यावर हात माराल.

Video : सौदीत स्कर्ट घालून फिरणाऱ्या तरूणीला चाबकाचे फटके मिळणार?

चीनचे राष्ट्रध्यक्ष शी जिंगपिंग यांची काही तुलना काही खोडकर नेटिझन्सने विनी द पूशी केली आहे. याचे मीमही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहे. आता विनी द पू काही वाईट कार्टुन कॅरेक्टर नाही तरीही त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. विनीमुळे शी यांचं कम्युनिस्ट पक्षाचं नाव खराब झालंय तेव्हा त्याच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी जेव्हा शी यांची भेट घेतली होती तेव्हा या दोघांचे मीम चीनी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. तेव्हापासून खोडकर नेटिन्सने शी यांची तुलना विनीशी केलीय. ती काही केल्या थांबतच नाही. तेव्हा अधिकृतरित्या या कार्टुन कॅरेक्टरवर चीनच्या सोशल मीडियावर बंदी घालण्यात आलीय.

श्रीमंतांकडे चोरी करुन गरिबांचं भलं करणारा ‘रॉबिन हूड’ अखेर पोलिसांच्या ताब्यात

https://twitter.com/YuanfenYang/status/886463867110301698

https://twitter.com/joshchin/status/531792567424135168