जगात कुठेही सायबर फसवणूक झाली की, संशयाची सुई प्रथम चीनकडे दाखवली जाते, कारण चीनमध्ये बसलेले हॅकर्स. या हॅकर्सकडून फक्त छोटी बँक खातीच नाहीतर अनेक बड्या कंपन्यांची बँक खाती फोडली जात आहेत. भारतात तर अशी हजारो प्रकरणं समोर आली आहेत. अनेक कंपन्यांविरोधात चौकशी सुरु आहे. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, चीनमध्ये आर्थिक फसवणूक करणाऱ्यांविरोधात कडक शिक्षा केली जाते. याच शिक्षेचा व्हिडीओ सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे. जे पाहून तुम्हीही म्हणाल, देशाची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांना अशीच शिक्षा झाली पाहिजे.

ट्विटरवर @songpinganq नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, सोशल क्रेडिट सिस्टमच्या काळ्या यादीत असलेल्या आपल्या नागरिकांना चीन लज्जास्पद वागणूक देत आहे. शहरातील प्रत्येक बसस्थानकाच्या फलकावर, चौकाचौकात काळ्या यादीतील लोकांचे फोटो लावण्यात आले आहेत. सोबत त्यांचे नाव आणि पत्ता इतर काही माहिती झळकवण्यात आली आहे. जेणेकरून प्रत्येकजण त्यांना पाहू अशाप्रकारे आर्थिक फसवणूक करणार नाही आणि सतर्क राहिल. व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

चीनची सोशल क्रेडिट सिस्टीम काय आहे?

चीनमध्ये सोशल क्रेडिट सिस्टम नावाची एक व्यवस्था आहे. या अंतर्गत नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठेचे मूल्यमापन केले जाते. व्यक्ती, व्यवसाय आणि सरकारी संस्थांना त्यांच्या विश्वासार्हतेवर आधारित क्रेडिट स्कोअर दिले जातात. खराब क्रेडिट स्कोअर म्हणजे कर्ज मिळणार नाही. अनेक ठिकाणी खराब क्रेडिट स्कोर असलेल्या लोकांना सरकारी उपाययोजनांपासून वंचित ठेवले जाते. या आधारे जे कर्ज घेतल्यानंतर परतफेड करत नाहीत, त्यांचेही मूल्यमापन केले जाते. यावर उपाय म्हणून चीक सरकारने आता चौकाचौकात अशा व्यक्तींची नावं, पत्ता दुनियेसमोर प्रदर्शित केले जाते.

स्पर्म डोनेट करत बनला ५५० मुलांचा पिता, आता न्यायालयाने घातली बंदी; जाणून घ्या नेमके प्रकरण काय?

व्हिडिओला ३५ हजारांपेक्षा अधिक व्हूज

हा व्हिडिओ काही तासांपूर्वी ट्विटरवर शेअर करण्यात आला होता जो आतापर्यंत ३५,००० पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. जवळपास ४०० लोकांनी रिट्विटही केले असून ही संख्या सातत्याने वाढत आहे. काही लोकांनी कमेंट करत लिहिले की, हे अत्याचार केल्यासारखे आहे. आपला नागरिकांवर विश्वास असला पाहिजे, त्यांची अशी चेष्टा केली जाऊ नये.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर अनेकांनी कौतुक केले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देणाऱ्यांबाबतही असेच घडले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.