प्रत्येकजण आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी छोटी मोठी नोकरी आणि व्यवसाय करतात. कोरोना काळात अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. यावेळी काही लोकांनी मात्र नवीन स्टार्टअप्स आणि काहींनी विविध नोकऱ्यांमधून मोठी कमाई केली. अनेकदा एखादी नोकरी भरघोस प्रकार आणि कामाच्या प्रकारामुळे चर्चेत येते. अशाच प्रकारची एक विचित्र नोकरी सध्या प्रसिद्धी झोतात आली आहे. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना महिन्यांचा चांगला पगार आणि राहण्यासाठी मोफत घराची सुविधा देण्यात आली आहे. पण या नोकरीसाठीच्या काही अटी वाचून लोक ही नोकरी करण्यास नकार देत आहेत.
जगात दोन प्रकारचे लोक राहतात, एक म्हणजे जे शाहकारी असतात आणि कोणत्याही प्रकारचे व्यसन करत नाहीत. तर दुसरे म्हणजे, जे शाहकारी जेवणासह मासंहार देखील करतात. दारु आणि सिगारेट पिणे त्यांच्यासाठी सामान्य असते. पण एखाद्या कंपनीत तुम्हाला यावरुन प्रश्न विचारण्यात आले तर काय कराल?
आपल्या देशात एवढ्या पगाराची नोकरी सहसा कोणाला मिळत नाही. पण चीनमध्ये या नोकरीच्या जाहिरातीने खळबळ उडवून दिली आहे. ज्या देशात प्राणी-कुत्रा, मांजर, झुरळ, वटवाघुळ, साप, विंचू सहज खाल्ले जातात तिथे नोकरीसाठी आता शाकाहारी उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ही जाहिरात चर्चेत आली आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, चीनच्या दक्षिणेकडील शेनझेनमधील एका कंपनीने नोकरीसाठी अशी जाहिरात दिली आहे. ज्यामध्ये काही विचित्र मागण्या करण्यात आल्या आहेत. ८ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या या जाहिरातीनुसार, ऑपरेशन्स आणि मर्चेंडायझर्स या पदांसाठी महिना ५०,००० युआन (सुमारे ६०,००० रुपये) पगार देण्यात आला आहे. तसेच कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी मोफत सोयही केली आहे तसेच इतरही अनेक सुविधा आहेत. पण यासाठी कंपनीने काही अटी देखील घातल्या आहेत. त्या अटी कोणत्या आहेत जाणून घेऊ…
कंपनीच्या अटी ऐकून येईल चक्कर
कंपनीच्या अटीनुसार, केवळ अशा लोकांनाच नोकरीसाठी अर्ज करण्याची परवानगी आहे, जे दयाळू आणि चांगले वागणारे आहेत. तसेच ते धूम्रपान आणि दारू पिणारे नकोत. विशेष म्हणजे उमेदवार शाकाहारी असणे आवश्यक आहे.
कंपनीच्या एचआर विभागाच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही मांस खात असाल तर तुम्ही एखाद्या प्राण्याची हत्या करत आहात, ही क्रूरता आहे आणि हे कंपनीच्या संस्कृतीत न बसणारे आहे. कंपनीच्या कॅन्टीनमध्ये मांस दिले जात नाही. जे इथे काम करतात, त्यांना हे नियम पाळावे लागतील.