कलिंगडं द्या, घराचे मालक व्हा! नव्या घरांसाठी Down Payment म्हणून शेतमाल स्वीकारण्याची भन्नाट ऑफर, पण…

“डाऊन पेमेंट म्हणून ग्राहक गहू, लसूण या सारख्या गोष्टीही देऊ शकतात,” असंही सांगण्यात आलंय.

watermelons as payment
रीअल इस्टेटला मोठा फटका बसलाय (प्रातिनिधिक फोटो)

चीनमधील आर्थिक मंदीचा सर्वात मोठा फटका रीअल इस्टेट उद्योगाला बसलाय. याच मंदीच्या कालावधीमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चिनी कंपन्यांनी वेगवेगळ्या भन्नाट कल्पनांवर काम करुन खास ऑफर बाजारात आणल्यात. परिस्थिती एवढी वाईट आहे की चीनमधील अनेक घरं बांधणाऱ्या बड्या कंपन्यांनी कलिंगडं आणि शेतमलाच्या मोबदल्यात घरांची विक्री सुरु केलीय. शेतमाल हा पेमेंट स्वरुपात स्वीकरला जाईल असं कंपन्यांनी जाहीर केलं आहे.

“चीनमधील थर्ड आणि फोर्स टीयर शहरांमधील (महानगरे आणि दुय्यम दर्जाची शहरे वगळून इतर शहरे) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चिनी रीअल इस्टेट कंपन्यांनी वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या आहेत. “घरखरेदीसाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने डाऊन पेमेंट म्हणून ग्राहक गहू, लसूण या सारख्या गोष्टीही देऊ शकतात,” असंही सांगण्यात आलंय.

निनजींगमधील एका विकासकाने आपण घर घेण्यासाठी इच्छूक असणाऱ्या शेतकऱ्यांकडून २० युआन किलो दराने कलिंगडांच्या माध्यमातून डाऊन पेमेंट घेण्यास तयार असल्याचं ग्लोबल टाइम्सशी बोलताना सांगितलं. मात्र या ऑफरमुळे कंपनीअंतर्गत मतमतांतरे झाल्याने ती बंद करण्यात आली. “आम्हाला या ऑफरसंदर्भातील सर्व पोस्ट डिलीट करण्यास सांगण्यात आलं,” असं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. २८ जून ते १५ जुलैदरम्यान ही ऑफर देण्यात आली होती. जास्तीत जास्त पाच हजार किलो कलिंगडांची मर्यादा या पेमेंटसाठी घालून देण्यात आली होती. म्हणजेच १० हजार युआनचे पेमेंट कलिंगड किंवा शेतमालाच्या माध्यमातून करण्याची सवलत देण्यात आलेली. स्थानिक कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश या मागे असल्याचं सांगण्यात आलं.

चीनमधील रीअल इस्टेट उद्योगाला करोनाचा मोठा फटका बसला आहे. गुंतवणुकीचा हा चीनमधील सर्वोत्तम पर्याय म्हणून मानला जायचा. अगदी कर्ज काढून विकासक आणि ग्राहक घरांची खरेदी विक्री करायचे. मात्र मागील वर्षापासून याचं प्रमाण फारच कमी झालाय. चीनमधील एकूण कर्जांपैकी २७ टक्के कर्ज ही गृहकर्ज आहेत असं पॉलिसी रिसर्च ग्रुपच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय.

सारखा शेतमालही देऊ शकतात. शेकडो तयार घरं विक्री वाचून पडून आहेत. त्यामुळेच आता ग्राहकांना आणि त्यातही शेतकऱ्यांना गृहखरेदीसाठी आकर्षित करण्याच्या उद्देशाने या ऑफर देण्यात आल्यात,” असं ग्लोबल टाइम्सने म्हटलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chinese real estate developers accepting watermelons as payment scsg

Next Story
काम करावं तर असं! मुंबईच्या मुसळधार पावसातून ऑर्डर पोहचवण्यासाठी Swiggy डिलिव्हरी बॉयचा घोड्यावरून प्रवास
फोटो गॅलरी