How Cobra Spits Venom: जेव्हा निसर्ग आपली खरी ताकद दाखवतो, तेव्हा माणूस फक्त पाहत राहतो. कोब्रा सापाच्या विषारी हल्ल्याचा असा थरकाप उडवणारा क्षण सध्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे आणि त्याने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. सामान्यपणे आपण साप पाहिलेला असेल, त्याच्या फण्याने घाबरलोही असू, पण जर कोब्रा आपल्या तोंडातून थेट विष फेकत असेल तर? विश्वास बसत नाही ना? सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ धुमाकूळ घालतोय, जो पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. यात एक नव्हे, तर अनेक कोब्रा साप आपल्या फण्यातून जसा विषाचा मारा करतात, ते दृश्य इतकं धक्कादायक आहे की, अंगावर शहारे येतात. हा व्हिडीओ केवळ थरार देत नाही, तर सावध राहा, असंही सांगतो. कारण- काही चुका जीवावर बेतू शकतात…
सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. तुम्ही अनेक वेळा सापांचे व्हिडीओ पाहिले असतील; पण कोब्रा फणा उभारून थेट तोंडातून कसे विष फेकतो, हे कधी पाहिलंय का? जर नाही, तर हा व्हिडीओ तुमचं संपूर्ण मत बदलून टाकेल.
या व्हिडीओमध्ये दिसतं की, काही कोब्रा साप आपल्या फण्यासह उभे राहतात आणि अचानक तोंडातून पातळ विष फेकतात. हे दृश्य इतकं धक्कादायक आणि धोकादायक आहे की ते पाहताना क्षणभरासाठी श्वास रोखल्याशिवाय राहत नाही. कोब्रा कसा शत्रूला सावध न करता, अचानक घातक हल्ला करतो, हे यात स्पष्ट दिसतं.
कोब्रा विष कसं फेकतो?
व्हिडीओमध्ये कोब्रा संपूर्ण ताकदीने फणा उभारतो आणि तोंडातून थेट विष फेकतो. हे विष काही वेळा इतक्या लांब जातं की, ते समोर उभ्या असलेल्या माणसाच्या डोळ्यांवरही परिणाम करू शकतं. म्हणूनच सर्पतज्ज्ञदेखील कोब्रा हाताळताना अत्यंत काळजी घेतात.
किती वेळात जीव जातो?
कोब्रा हा जगातील सर्वांत विषारी सापांपैकी एक मानला जातो. भारतात विशेषतः उत्तर भारतात याचा वावर अधिक आहे. एखाद्याला कोब्रा चावल्यास, ३० ते ४० मिनिटांत उपचार न मिळाल्यास मृत्यू निश्चित मानला जातो. विष नर्व्हस सिस्टीमवर थेट परिणाम करतं आणि त्यामुळे शरीराच्या हालचाली थांबतात.
हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. काहींनी याला “भीतीदायक”, तर काहींनी “माहितीपूर्ण”, असं म्हटलंय. विशेषतः पावसाळ्यात, शेतात किंवा जंगल भागात जाणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असा इशाराही सर्पतज्ज्ञ देतात.
हा व्हिडीओ केवळ धक्कादायक दृश्य दाखवत नाही, तर एक महत्त्वाचा संदेशही देतो. सावध राहा, सजग राहा आणि निसर्गातील अशा जीवांपासून योग्य अंतर ठेवा. व्हिडीओ पाहायचा धैर्य असेल, तरच पाहा; पण सावध राहा. कारण- ही फक्त माहिती नाही, तर तो एक सावधगिरीचा इशारा आहे.