अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील हिंडेनबर्ग कंपनीने भारतीय उद्योजक गौतमी अदाणी यांच्याबाबत एक अहवाल प्रकाशित केला होता. या अहवालात हिंडेनबर्ग कंपनीने गौतम अदाणी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. परदेशात कागदावर कंपन्या स्थापन करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप हिंडेनबर्गने केला होता. या अहवालानंतर गौतम अदाणी यांच्या विविध कंपन्यांचे शेअर्स रसातळाला गेले.

या प्रकरणानंतर काँग्रेसने गौतम अदाणी यांच्याविरोधात आंदोलन करायला सुरुवात केली आहे. भारतीय जनता पार्टी गौतम अदाणी यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेसचे अनेक नेते रस्त्यावर उतरून गौतम अदाणी यांच्याविरोधात आंदोलन करत आहे. संसदेतही याच मुद्द्यावरून सरकारला सवाल विचारले जात आहेत.

अशी एकंदरीत स्थिती असताना काँग्रेसच्या आंदोलनाचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. एका आंदोलनकर्त्या व्यक्तीने नवरदेवचा पोशाख परिधान आंदोलनात सहभाग घेतला. त्याने नगरदेवाचे कपडे, पायात बूट, डोक्यावर टोपी आणि गळ्यात नोटांचा हार… अशी वेशभूषा करत आंदोलनात सहभाग घेतला.

यावेळी संबंधित आंदोलनकर्त्याने पोलिसांनी लावलेला अडथळा ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी इतर आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी त्याला उचलून बॅरिकेड्सच्या पलीकडे ढकलण्याच्या प्रयत्न केला. पण दुसऱ्या बाजुने पोलिसांनी नवरदेवाच्या वेशातील आंदोलनकर्त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला. यामुळे नवरदेव बराच वेळ हवेत हेलकावे घात होता. या आंदोलनाचा मजेशीर व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.