Viral Video: बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर किरण रावचा ‘लापता लेडीज’ हा सिनेमा नुकताच ओटीटीवर प्रदर्शित झाला. ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर या सिनेमाची एकच चर्चा दिसून आली आहे. चित्रपटाची कथा तर लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचली; पण चित्रपटातील गाण्यांनीसुद्धा प्रेक्षकांना वेड लावलं आहे. सोशल मीडियावर सतत रील्सद्वारे ऐकू येणारं या चित्रपटातील सगळ्यात खास गाणं म्हणजे ‘ओ सजनी रे’. तर आज सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओत या गाण्याचं दिल्ली पोलिस अधिकाऱ्याकडून सादरीकरण करण्यात आलं आहे.

आमिर खान प्रॉडक्शन निर्मित ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचं दिग्दर्शन किरण रावनं केलं आहे. तसेच चित्रपटातील ‘ओ सजनी रे’ हे गाणं संगीतकार राम संपत, गीतकार प्रशांत पांडे व गायक अरिजित सिंग यांनी तयार केलं आहे. आता या गाण्याचं वेड दिल्ली पोलिस अधिकाऱ्यालासुद्धा लागलं आहे. रजत राठोर या दिल्ली पोलिस अधिकाऱ्यानं हे गाणं कोणत्याही वाद्य किंवा साउंड ट्रॅकशिवाय अगदी मनापासून गाऊन दाखवलं आहे. कोणत्याही वाद्याशिवाय दिल्ली पोलिस अधिकाऱ्यानं सादर केलेलं ‘ओ सजनी रे’ गाणं एकदा तुम्हीसुद्धा नक्की ऐका.

हेही वाचा…गारेगार रिक्षासाठी चालकाचा नवा प्रयोग; हिरवंगार गवत, पोपट अन् बरंच काही… VIDEO पाहून सांगा तुम्हाला प्रवास करायला आवडेल का?

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, रजत राठोर हे एका कारमध्ये बसलेले असतात. व्हिडीओ समोर ठेवून ते नेटकऱ्यांना आता मी गाणं सादर करणार आहे, असं सांगताना दिसत आहेत. त्यानंतर ते गाणं गाण्यास सुरुवात करतात. रजत राठोर यांनी ताला-सुरात गायलेलं गाणं ऐकून तुम्हीसुद्धा मंत्रमुग्ध व्हाल आणि दिल्ली पोलिस अधिकाऱ्याचं हे अप्रतिम कौशल्य पाहून नक्कीच प्रभावित व्हाल आणि पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ नक्की बघाल.

प्रत्येक व्यक्तीमध्ये एक अनोखं कौशल्य असतं. नोकरी करता करताच बहुतांश जण कसला ना कसला एक तरी छंद जोपासत असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. त्यातच गाणं गाणे हा छंद तर अगदी सगळ्यांच्या आवडीचा आहे, असे म्हणायला हरकत नाही. टीव्ही, मोबाईलवर गाणी ऐकत गुणगुणणं किंवा एखादं काम करताना गाणं मोठ्यानं लावून त्याचा सराव करण्याची अनेकांना आवडत असते. तर, आज दिल्ली पोलिस अधिकाऱ्याच्या याच गानकौशल्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @rajat.rathor.rj या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून दिल्ली पोलिस अधिकाऱ्याच्या या कलेचं नेटकऱ्यांकडून जबरदस्त कौतुक होत आहे. वर्दी घालून गुन्हेगारांना शिक्षा देणाऱ्या दिल्ली पोलीस अधिकाऱ्याचं आज एक अनोखं रूप सोशल मीडियावर पाहायला मिळालं आहे, असं म्हणायला हरकत नाही.