रोजच्या कामामुळे कोणालाही ताण येणे स्वाभाविक आहे, असाच ताण पोलिसांना देखील नक्कीच येत असेल. पोलिसांना सतत कार्यक्षम राहावे लागते, त्यांच्यामुळे समाजात कायदा आणि सुव्यवस्थेचे काटेकोर पालन केले जाते. इतकी मोठी जबाबदारी असणाऱ्यांना देखील कामाचा ताण येत असेल. प्रत्येकजण यावर स्वतःचा काही पर्याय शोधतो, कोणी काही खेळ खेळून हा ताण कमी करण्याचा प्रयत्न करतात, तर काहीजण इतर काही गोष्टी करतात. असाच ताण घालवण्यासाठी खेळण्यात आलेला एक खेळाचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही पोलीस ‘ट्राय नॉट टू लाफ’ हा खेळ खेळताना दिसत आहेत.

नागालँडचे मंत्री तेमजेन इमना यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या ‘ट्राय नॉट टू लाफ’ चॅलेंजमध्ये पोलीस हसू आवरण्यासाठी कसे प्रयत्न करतात आणि काहींना हसू अनावर झाल्याने त्यांना त्याची काय शिक्षा मिळते पाहा.

आणखी वाचा : पाण्यात बुडणाऱ्या कावळ्याला अस्वलाने दिले जीवदान; नेटकऱ्यांना भावलेला Viral Video एकदा पाहाच

तेमजेन इमना यांनी शेअर केलेला व्हिडीओ :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ शेअर करताना तेमजेन इमना यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘रोजच्या कामात आपण कितीही व्यस्त झालो तरी नेहमी आनंदी आणि उत्साही राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फेसबूकवर हा व्हिडीओ दिसला, फ्रंटलाइन वर्कर्सना ड्युटीच्या वेळेनंतर अशी मजा करतानाचा हा व्हिडिओ प्रेरणादायी आहे.’ तेमजेन इमना यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमधील ‘ट्राय नॉट टू लाफ’ चॅलेंज पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर झाले असून, अनेकांनी त्यांनाही हा खेळ खेळायचे असल्याचे कमेंटमध्ये म्हटले आहे.