करोनामुळे देशातील चित्रच बदलून गेलं आहे. दररोजची दिसणार वर्दळ गायब झाली आहे. हजारो वाहनं धावणारे रस्ते सुनसान आहेत. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक जण घरात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाउन लागू केल्यानंतर घराबाहेर पडण्याचे सर्व रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे घरात बसून कंटाळेल्या सगळ्यांसमोर २१ दिवस कसे काढायचे असा प्रश्न पडला आहे. तुमचं हे टेन्शन दूर करण्यासाठी यू ट्यूबवर असलेले खतरनाक व्हिडीओ आम्ही तुम्हाला सूचवत आहोत. यात काही काही व्हिडीओ तुम्हाला प्रेरणादायीआणि आयुष्याकडं नव्या नजरेनं बघायला लावणारे आहेत.

सुपरहिट विनायक माळी –

विनायक माळी नावाचा एक हरहुन्नरी कलाकार हे चॅनेल चालवतो. आगरी कोळी भाषेतील लकब आणि संवादफेक यामुळे त्याचे व्हिडीओ यू-ट्यूबर तुफान हिट होतात. दररोजच्या जीवनातील वेगवेगळ्या प्रसंगांवर आधारित हे व्हिडीओ बघितल्यानंतर तुम्ही खळखळून हसाल्याशिवाय राहणार नाही.  इथे भेट द्या- https://www.youtube.com/channel/UCSB-L3HN2tJoizsxR45vUFQ

मराठी व्हायरल फिवर –

वैदर्भीय भाषेचा तडका असलेल्या चॅनेलवरील व्हिडीओ म्हणजे फूल टू मनोरंजन. डोनाल्ड ट्रम्पपासून ते गावात घडणाऱ्या घटनापर्यंत. डब केलेल्या व्हिडीओला तुफान प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळतो. तुम्ही एकदा ऐकलं तर नेहमीच ऐकत राहाल असं हे चॅनेल आहे. सगळे व्हिडीओ मिळतील इथे – https://www.youtube.com/channel/UCOy3bNvSmTPYxTFigm-NPkQ

ऐसी तैसी डेमोक्रसी –

प्रसिद्ध गीतकार, पटकथा लेखक वरुण ग्रोवरचं नाव तुम्ही ऐकून असाल. नसलं ऐकलं तर मोह मोह के धागे गाणं तर ऐकलंच असेल. ते गाणं वरूण ग्रोवरनेच लिहिलेलं आहे. तर वरूण ग्रोवर आणि त्याच्या सहकाऱ्यांचं हे चॅनेल आहे. स्टॅण्ड कॉमेडीचा टच असलेले यावरील व्हिडीओ देशातील स्थितीवर व्यंगात्मक नजरेनं भाष्य करणारे आहे. त्यामुळे हे व्हिडीओ बघून तुमचा थकवा जाईल, हे निश्चित. क्लिक करा – https://www.youtube.com/channel/UCBM582VlflRbNRoYpAOptag

उम्मीद –

दररोजच्या आयुष्यात अनेक घटना घडतात. ज्यामुळे आपलं मनोबल कमी होतं. जशी आपल्याला आता करोनामुळे एक भीती मनात घर करून आहे. अशा चिंताग्रस्त वातावरणात ‘उम्मीद’चे व्हिडीओ तुम्हालाही बळ देतील. प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन झाकिर खान यांनं या ‘शो’तून वेगवेगळ्या मुद्यांविषयी असलेला न्यूनगंड दूर करतो. हा शो तुम्हाला नक्कीच आवडेल. https://www.youtube.com/playlist?list=PLzVBBIBXJmQHt4HdcCbtmQR5QlJrHOkHi

नौटंकी साला –

हे मराठी कॉमेडी चॅनेल आहे. वेगवेगळे नेत्यांच्या व्हिडीओला डब करून कॉमेडीचा दिलेला तडका बघणाऱ्यांना पोट धरून हसायला लावतो. तुम्ही खूपच बोअर झाला असाल तर मग हे व्हिडीओ नक्की पहा. https://www.youtube.com/channel/UCoJrRuTecCxSPZJY_gCloAg

मैं शून्य पे सवाल हूँ –

उर्दू भाषेला समुद्ध करणारी रेख्ता नावाची संस्था तुम्हाला माहित असेल वा नसेल. पण रेख्ताच्या कार्यक्रमातील झाकिर खानचा हा व्हिडीओ तुम्ही ऐकायलाच हवा. समजायला अवघड वाटणारी शायरीच्या तुम्हीही प्रेमात पडाल.

याचबरोबर मुंबईच्या जडणघडणीविषयीची माहिती जाणून घ्यायची असेल. मुंबई कशी घडत गेली. कुणी घडवली? असे प्रश्न तुमच्या मनात असतील तर गोष्ट मुंबईची ही मालिका बघायला विसरू नका. त्यासाठी https://www.youtube.com/loksattalive इथे क्लिक करा.