Couple romance on bike Viral video: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आजकाल सोशल मीडियावर प्रेमाच्या नावाखाली अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही जोडपी प्रेमाच्या मर्यादा ओलांडून सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये करताना दिसतात. त्यांच्या या कृतीमुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो; पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ही जोडपी एकमेकांच्या प्रेमात इतकी बुडालेली असतात की, आपण कुठे आहोत, याचं भानदेखील त्यांना उरत नाही. यापूर्वी रोमान्स करणाऱ्या अनेक कपलचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धावत्या बाईकवर कपलचे अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

रस्त्यावर अशा गोष्टी करणे म्हणजे वाहतुक नियमाचं उल्लंघनदेखील आहे.भर दिवसा रस्त्यावर धावत्या बाईकवर रोमान्स करताना एक जोडप कॅमेऱ्यात कैद झाले आहे. वाहतूक नियमाचं उल्लघंन केल्याप्रकरणी पोलिसांनी अशा बाइकस्वारांवर कारवाईही केली. मात्र पोलिसांचा धाक या प्रेमी युगुलांवर दिसून येत नाही आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये एक तरुण जोडपं चालत्या बाईकवर रोमान्स करत असल्याचं दिसून येतं.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोघांचा हा व्हिडिओ मागून येणाऱ्या कारचालकांनी शूट करून सोशल मीडियावर टाकला आणि तो तुफान व्हायरल झाला.व्हिडिओमध्ये तरुण हेल्मेट न घालता बाईक चालवत आहे आणि तरुणी टाकीवर बसून त्याला मिठी मारून आहे. तिचे दोन्ही पाय मागच्या सीटवर ठेवलेले असून ती दोन्ही हातांनी प्रियकराला घट्ट पकडून आहे.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत बाईकची ओळख पटवून संबंधित कपलविरुद्ध कारवाई केली आहे. यामध्ये एकूण ५३,५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ट्रॅफिक नियमांचे गंभीर उल्लंघन, सार्वजनिक ठिकाणी अनुचित वर्तन आणि इतर वाहनचालकांच्या सुरक्षिततेला धोका या सगळ्यांवर ही कारवाई झाली. नेटकरीही व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.