Mumbai airport viral video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतं असतात. मुंबई विमानतळावरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका जोडप्याचा आणि इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांमध्ये बोर्डिंगला उशीर झाल्याने वाद झाला. यावेळी या जोडप्यानं कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून नेटकरीही संताप व्यक्त करत आहे.

एका प्रवाशाने गुपचूप व्हिडिओ शूट केला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक माणूस कर्मचाऱ्यांवर ओरडताना दिसत आहे. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगीही आहे. विमान अहमदाबादला जाणार आहे. एअरपोर्टवर यायला या जोडप्याला उशीर झाला आणि कर्मचाऱ्यांनी गेट बंद केले होते, त्यामुळे ते जोडपं भडकलं होतं. व्हिडिओ जसजसा पुढे जातो तसतसे पत्नीचाही वाद सुरू होतो, तर दुसरीकडे कर्मचारी अतिशय नम्रपणे प्रतिसाद देत आहेत. या कर्मचाऱ्यांचंही नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. हा व्हिडिओ बोर्डिंग गेटजवळ बसलेल्या एका व्यक्तीने शूट केला होता. हे जोडपे शेवटी फ्लाईटमध्ये चढले की त्यांना उतरवले गेले हे माहित नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> शाळेत बाकांचा ढोल अन् कंपास पेटीचा ततड-ततड ताशा; विद्यार्थ्यांचा अफलातून VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंतरराष्ट्रीय प्रवास करताना विमानतळावर किमान साडेतीन तास तर देशांतर्गत प्रवास करताना किमान अडीच तास आधी पोहोचावे लागते मात्र या जोडप्याला फारच उशीर झाला आणि गेट बंद करण्यात आलं.या व्हिडिओला जवळपास ५० हजार व्ह्यूज मिळाले आहेत. बरेच लोक या जोडप्यावर उशीर झाल्याबद्दल आणि नंतर गोंधळ निर्माण केल्याबद्दल टीका केली आहे.