Couple Kissing Viral Video: प्रेम हे जगातलं सर्वात सुंदर नात आहे, असं म्हणतात. प्रेमात माणसं अगदी वेडी होतात असंही म्हटलं जातं. प्रेम करायला जागा अन् वेळ-काळ बघावा लागत नाही. पण या पवित्र नात्यात मर्यादा ओलांडूनही चालत नाही.

आपलं एखाद्या व्यक्तीवर प्रेम असलं की ते मनमोकळेपणानं बोलून दाखवावं, त्याच्यासमोर मनातलं सगळं व्यक्त करावं, असं अनेकांना वाटत असतं. आजच्या काळात कपल्स गार्डनमध्ये, ट्रेनमध्ये अशा सार्वजनिक ठिकाणीही अगदी कशाचीही चिंता न करता आपलं प्रेम व्यक्त करू लागले आहेत.

प्रेम व्यक्त करण्यात काही चुकीचं नाही, पण आजूबाजूचं भान ठेवणंही तितकंच गरजेचं असतं. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत नाही ना याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. पण, आजकाल तरुण-तरुणी कुठेही आपल्या मर्यादा ओलांडू लागले आहेत. कुठेही अश्लील कृत्य करू लागले आहेत. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आपण पाहिलेच असतील. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक कपल रेल्वे स्थानकावर अश्लील चाळे करताना दिसत आहे.

बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचा व्हिडीओ व्हायरल (Girlfriend Boyfriend Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक कपल अगदी बेभान होऊन आपल्या मर्यादा ओलांडताना दिसतायत. चक्क रेल्वेस्थानकावर बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला किस करताना दिसत आहे. आजूबाजूला माणसांची गर्दी असूनही दोघांचे अश्लील चाळे सुरूच आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकले नसले तरी, सोशल मीडियावर या व्हिडीओमुळे संतापाची लाट उसळली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @_sathi_ms या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला ११ हजारांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “यांना कसलीच लाज उरली नाही.” तर दुसऱ्याने “आजूबाजूचंदेखील भान नाही याना” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “आता तर सगळीकडेच असं पाहायला मिळतं”