Viral Couple Dance Video: सोशल मीडियावर रोज नवनवीन डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण यावेळी जे घडले, त्याने खरोखरच इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. एका कपलने “मुक्काला मुकाबला” या प्रभु देवा यांच्या सुपरहिट गाण्यावर असा झकास परफॉर्मन्स केला की, प्रेक्षक थक्क झाले. इतकंच नव्हे, तर हा व्हिडीओ लोकांनी इतक्या वेळा पाहिला की, थेट एक कोटीचा आकडा पार झाला.
काय आहे व्हायरल व्हिडीओत खास?
इन्स्टाग्रामवर @dj_lokee (लोकित कुमार) यांनी हा भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात नवरा–बायकोचं एक जोडपं उत्साहानं नाचताना दिसतं. महिला गुलाबी साडीत झळकत आहे; तर पुरुष पारंपरिक पांढरा शर्ट आणि लुंगी घालून धमाल करतोय. त्यांच्या अचूक स्टेप्स, अप्रतिम टायमिंग आणि जबरदस्त केमिस्ट्री पाहून तिथे उपस्थित पाहुणेही टाळ्या वाजवत, शिट्ट्या मारत, त्यांना चिअर करीत असल्याचे दिसत होते. मुक्काला मुकाबला… या गाण्याच्या ठेक्यावर प्रेक्षक वेडे झाले होते. मंचावर उतरलेल्या नवरा-बायकोच्या या जोडीने असा झकास डान्स सादर केला की, संपूर्ण इंटरनेट त्यांच्यावर फिदा झाले आहे.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
गुलाबी साडीतील पत्नी, पारंपरिक लुंगीतील पती आणि पार्श्वभूमीवर वाजणारं प्रभु देवा यांचं मुक्काला मुकाबला हे गाणं… या संगमाने जी जादू निर्माण केली, त्याने इंटरनेटवर खळबळ उडवली आहे. या जोडीचा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करताना लोकित कुमार यांनी लिहिलं – “अविस्मरणीय क्षण तयार करीत आहे. या सुंदर कपलसारख्या अदभुत लोकांना भेटून खूप आनंद झाला.” लोकांनीही या डान्सवर भरभरून प्रेम दाखवले. कुणी त्यांना “जगातील सर्वांत सुंदर जोडी” म्हटले, तर कुणी लिहिले – “या कपलचा डान्स पाहून मन प्रसन्न होतंय.”
प्रेरणादायी परफॉर्मन्स
काही युजर्सनी तर या परफॉर्मन्समधून प्रेरणाही घेतली. एकीने लिहिले, “कोणी काहीही म्हटलं तरी माझ्यासाठी तो माझा हीरो आहे, मी त्याची हिरोईन आहे. एवढंच पुरेसं आहे. आयुष्यात खुश राहा, चिंता सोडा आणि मजा घ्या.”
प्रभु देवा यांच्या गाण्याची आठवण
या कपलचा डान्स पाहून लोकांना १९९४ मध्ये आलेला तमीळ चित्रपट ‘कधलन’मधील प्रभु देवा यांचा सुपरहिट सीन आठवला. ‘मुक्काला मुक्काबाला’ हे प्रभु देवा यांच्या कारकिर्दीतील सर्वांत संस्मरणीय कामांपैकी एक मानलं जातं.
येथे पाहा व्हिडीओ
एकूणच या कपलने सादर केलेल्या धमाकेदार डान्सने सोशल मीडियावर झंझावात निर्माण केला आहे. लोक वारंवार हा व्हिडीओ पाहत आहेत आणि इंटरनेटवर त्या परफॉर्मन्सचीच चर्चा रंगली आहे.